The CA exam is now live in November 
पुणे

विद्यार्थ्यांनो, सीए परीक्षेची तयारी करताय? वाचा महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे :'कोरोना'चा संसर्ग वाढत असल्याने व परीक्षेचे नियोजन करण्यात येत असलेले अडथळे आणि अनेक विद्यार्थी गावाकडे असल्याने मे २०२० मध्ये पुढे ढकलेली 'सीए'ची परीक्षा आता थेट नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे 'द इस्टीट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंन्टस आॅफ इंडिया' (आयसीएआय) जाहीर केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीएची परीक्षा वर्षातून दोन वेळा म्हणजे मे आणि नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जातात. 'आयसीएआय'ने मे महिन्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज देखील भरले होते. मात्र, लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी हे क्लासेस सोडून त्यांच्या गावाकडे निघून गेले. ही पुढे ढकललेली परीक्षा जुन किंवा जुलै महिन्यात घेण्याचे नियोजन होते, मात्र राज्य व केंद्र सरकारने लाॅकडाऊनचा कालावधी वाढवला आहे, त्यामध्ये शाळा, महाविद्यालये यासह इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. 

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

लाॅकडाऊन काळात अनेक विद्यार्थी त्यांच्या परीक्षा केंद्रापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र बदलून सोईचे केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जुलै मध्ये परीक्षा द्यायची नाही त्यांनी नोव्हेंबर मध्ये परीक्षा द्यावी असे सुचविण्यात आले होते. मात्र, त्यास विद्यार्थ्यांनी नुकसान होण्याच्या भीतीने विरोध केला होता. तसेच शिक्षण संस्था बंद असल्याने परीक्षांचे नियोजन करणेही अवघड जात आहे. त्यामुळे 'आयसीएआय'ने मे-जुलै २०२० ची परीक्षा रद्द करून ती थेट नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 
 

यामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क पुढच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाईल. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. 'आयसीएआय' पुणे शाखेच्या माजी अध्यक्ष ऋता चितळे म्हणाल्या, 'कोरोना'मुळे अनेक विद्यार्थी गावाकडे गेले आहेत, त्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुभा दिली होती, पण सध्याची स्थिती पहाता परीक्षांसाठी शाळा, महाविद्यालय उपलब्ध होणे, पर्यवेक्षक मिळणे अवघड होणार आहे. यामुळे आता थेट नोव्हेंबर मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी जास्त वेळ मिळणार असल्याने, जे विद्यार्थी एका ग्रुपची परीक्षा देणार होते, ते आता दुसऱ्या ग्रुपची ही तयारी करू शकतील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पहाटे गारवा, दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा चटका, बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?

सलमानच्या गाजलेल्या तेरे नामचा सिक्वेल येणार ? निर्माते म्हणाले..

चांदी बाजारात खळबळ, भारताच्या प्रचंड मागणीमुळे संकट; ४५ वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती, एका दिवसात ७ हजाराने घसरण

INDW vs ENGW : लढूनही हरल्या...! वर्ल्ड कपमधील पराभव स्मृती मानधनाच्या जिव्हारी लागला; अश्रू आलेच होते, पण...

Panchang 20 October 2025: आजच्या दिवशी शिवकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT