पुणे

Pune Ahmednagar Highway Accident : कार-कंटेनरच्या भीषण अपघातात तीन बालकांसह 5 ठार

रांजणगाव एमआयडीसी येथील एलजी कंपनीसमोरून एक मोठा कंटेनर उलट दिशेने येत होता.

सकाळ डिजिटल टीम

Ahemadnagr Pune Raod Accident : पुणे- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. रांजणगाव एमआयडीसीमधील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मयत पनवेलला जाण्यासाठी निघाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहानमुलांचादेखील समावेश आहे.

या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के(वय.५३), राम भाऊसाहेब म्हस्के(वय.४५),राजू राम म्हस्के(वय.७वर्षे),हर्षदा राम म्हस्के(वय.४ वर्षे),विशाल संजय म्हस्के(वय.१६वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून साधना राम म्हस्के (वय.३५) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या अपघातातील सर्व जखमी हे आवाने बुद्रुक (ता.शेवगाव, जि.अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरून म्हस्के कुटुंब हे पुणे बाजूकडे जात असताना समोरून चुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर(एच आर.३७ ई ७७८९) ची इको कार (एम एच.४६ ए. एच.००६३या वाहनाला जोरदार धडक बसली. ईको कार नगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. मयत कुटुंब नगरमधील लग्नकार्य आटपून पुन्हा पनवेलकडे निघाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये तीन लहानमुलांचा समावेश असून, त्यांचे वय 14 वर्षे, 7 वर्षे आणि एक चार वर्षीय चिमुकलीचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

ट्रक चालक फरार

दरम्यान, घटनेनंतर संबंधित ट्रक चालक आणि त्याच्या सोबतच्या हेल्परने पळ काढला असून, पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. तसेच पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025 : कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदिर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

Jalgaon News : गणेशोत्सवासाठी कोकणात बस गेल्या; जळगावात ३,७२० फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

Phulambri News : बेपत्ता तरुणाचा समृद्धीलगत विहिरीत आढळला मृतदेह

Jalgaon News : जळगाव बाजार समितीत महायुतीला जोरदार धक्का; उद्धव ठाकरे गटाचे सुनील महाजन सभापती

Latest Marathi News Updates: उद्धव ठाकरेंनी साधला मनोज जरांगे पाटलांशी संपर्क

SCROLL FOR NEXT