Girls_Hostel 
पुणे

'घरभाडं द्या नाहीतर...'; नवी पेठेत राहणाऱ्या विद्यार्थिनीला घरमालकिणीने दिली धमकी अन् मग...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवी पेठेतील एका इमारतीत राहणाऱ्या विद्यार्थिनीला घरभाड्यासाठी घरमालकिणीने धमकावले. एवढे करून ती गप्प बसली नाही. त्यानंतर तिने त्या विद्यार्थीनीला खोली सोडण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थीनीने संबंधित प्रकार पोलिसांच्या कानी घातला. त्यानंतर सोमवारी (ता.१) घरमालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरभाड्यासाठी विद्यार्थिनीला धमकावण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर उपायुक्त सिंह यांनी सोमवारी मेधा बोथरा या विद्यार्थिनीबरोबर वैयक्तिक संपर्क साधला. तिची तक्रार त्यांनी ऐकून घेतली.

मूळची चंद्रपूरची असलेली मेधा पुण्यात स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी आली आहे. ती नवी पेठेतील एका इमारतीतील खोलीत दरमहा एक हजार 700 रुपये भाडे देऊन पेईंट गेस्ट म्हणून राहते. घरभाडे न दिल्यास खोली रिकामी करण्याची धमकी घरमालकिणीने मेधाला दिली होती. घर दुरूस्त करायचे आहे. त्वरीत खोली रिकामी कर, असे तिला सांगण्यात आले होते.

कोरोनाच्या या संकटकाळात रूम सोडून दुसरीकडे राहायला जाणे शक्य नसल्याने तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची शहानिशा करण्यात आल्यानंतर घरमालकिण मेधाला धमकावत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर घरमालकिणीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात भादंवि 188 (आदेशाचा भंग), 506 (धमकावणे) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. वेंकटेशम यांनी अशा प्रकारांची दखल घेतली असून विद्यार्थ्यांकडे घरभाड्यासाठी तगादा लावू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

भाडेवसुली किमान पुढे ढकलण्याची सूचना
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकजण भाडे भरू शकत नाहीत. या परिस्थितीचा विचार करता घरमालकाने सक्तीने भाडे वसूल करू नये. भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशी लेखी सूचना गृहनिर्माण विभागाने केली होती. आदेश जाहीर झाल्यानंतर भाडेवसुलीसाठी तगादा लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असे आदेशात म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT