Gas_Cylinder 
पुणे

पुणे : गॅस सिलेंडरचा काळा बाजार; 33 हजाराचे सिलेंडर जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात संचारबंदी सुरू असताना सिलेंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करुन ग्राहकांना जादा दराने सिलेंडरची विक्री करण्यात येत असल्याची दुसरी घटना शहरामध्ये घडली.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने 33 हजार रुपयांचे सिलेंडर जप्त करून विनापरवाना विक्री करणाऱ्याविरुद्ध अत्यावश्‍यक वस्तू कायद्यान्वये चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमित सुगंधचंद गोयल (वय 30, रा.कोडियाड सोसायटी, सुंदराबाई शाळेजवळ, चंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या गॅस एजन्सी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथीलर सागर पार्क, लेन नंबर दोन येथे एका गॅस एजन्सी धारकाकडून अत्यावश्‍यक वस्तु कायद्याचा भंग करून 796 रुपये किंमतीचा घरगुती सिलेंडर ग्राहकांना एक हजार रुपयांना विक्री करीत असल्याची खबर पोलिस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद यांना मिळाली. 

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी बनावट ग्राहक पाठवून सिलेंडर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोयल हा ग्राहकांना मुळ किंमतीऐवजी जादा दराने ग्राहकांना सिलेंडर विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्याकडे गॅस सिलेंडर विक्रीचा कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध गॅस कंपन्यांचे भरलेले 16 गॅस सिलेंडर, रोकड, 48 ग्राहक कार्ड असा एकूण 33 हजार 733 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, खडकी परिसरात याच पद्धतीने बेकायदा गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी चालक, मालक व कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच प्रकारची घटना घडली. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदिप मुंढे, दिपक चव्हाण,मोहन वाळके,आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT