15th_Finance_Commission 
पुणे

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; १५ व्या वित्त आयोगाचा निम्मा निधी 'या'साठी ठेवला राखीव

गजेंद्र बडे

पुणे : केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी हा फक्त पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी संकलन, स्वच्छता व हागणदारीमुक्त गावांचा दर्जा कायम राखण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना आता आपापल्या गावांचे चालू आर्थिक वर्षाचे गाव विकास कृती आराखडे बदलावे लागणार आहेत. 

दरम्यान, हे आराखडे सुधारीत तयार करून पुन्हा नव्याने ते प्लॅन प्लस या प्रणालीत अपलोड करावे लागणार आहेत. अपलोड करण्यापूर्वी या सुधारित आराखड्यांना पहिल्यांदा ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत आणि त्यानंतर ग्रामसभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यासाठी ३१ मे ही डेडलाईन (अंतिम मुदत) देण्यात आली आहे. 

वितरण आयोगामार्फत केंद्र सरकारकडून गावांच्या विकासासाठी निधी दिला जातो. त्यानुसार दर पाच वर्षांनी नवा आयोग स्थापन केला जातो आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार गावांना निधी दिला जातो. यासाठी पहिल्यांदा गावनिहाय  गाव विकासाचा पंचवार्षिक कृती आराखडा आणि त्यानंतर दरवर्षी आर्थिक वर्षनिहाय विकास आराखडा तयार करून त्यास ग्रामपंचायतींच्या सभेत आणि ग्रामसभेत मंजुरी घ्यावी लागते. यानुसार हे आराखडे आधीच ग्रामसभांमध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु केंद्र सरकारच्या या नव्या आदेशामुळे पुन्हा सुधारित आराखड्यांसाठी ही प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. 

चौदाव्या वित्त आयोगाची मुदत ३१ मार्च २०२० लाख संपली आहे. १ एप्रिल २०२० पासून पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

सुधारित आराखड्यात स्वच्छता व पाणीविषयक कामांसाठी निर्माण निधी गृहित धरुन संभाव्य प्राप्त निधीच्या सव्वा ते दीडपट कामांचे नियोजन करावे लागणार आहे.

राज्यातील पंचायतराज संस्था

जिल्हा परिषदा ३४
पंचायत समित्या ३५४
ग्रामपंचायतींची संख्या २७,९०८
पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्या १३
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती १,४०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT