Chances of torrential rains today evening in Pune 
पुणे

Pune Rains : पुणेकरांनो, आजही लवकर घरी जा, कारण...

सकाळ वृत्तसेवा

Pune Rains : पुणे : शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पुणेकरांनो कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर परत जा. शाळेतून मुलांना लवकर घरी घेऊन या आणि पावसात अडकलाच तर झाडाखाली किंवा झाडाच्या जवळपासही थांबू नका. 

Pune Rains : पुणेकरांनो, आज संध्याकाळी लवकर घरी पोहचा कारण...

शहरात सकाळी आकाश अंशतः ढगाळ होते. त्याच वेळी दुपारी उन्हाचाही चटका जाणवत होता. ऑक्‍टोबर हीटची तीव्रता वाढेल, अशी शक्‍यताही वाटत होती. पण, दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले. त्यामुळे बाष्पिभवनाचा वेग मंदावला असला तरीही हवेतील आद्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून दुपारी तीन वाजल्यानंतर आकाश काळ्या कुट्ट ढगांनी व्यापले असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे पुढील चार तासांमध्ये वादळीवाऱ्यासह ढगांचा गडगडाट करत पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

पुण्यात झाड पडतानाचा व्हिडिओ

सिंहगड रस्त्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्याने सिंहगड रस्त्यांवरील वाहतूकीचा वेग मंदावला होता. 

Pune Rain : भाजपवाल्यांनो पुण्याचे हे काय केले?
Pune Rains : पुणे पुन्हा तुंबले
Pune Rains : मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT