Chandrakant Patil should not mislead the Brahmin community shivsena
Chandrakant Patil should not mislead the Brahmin community shivsena 
पुणे

‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

सकाळवृत्तसेवा

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरू नये व त्यांची दिशाभूल करू नये. ब्राह्मण समाजाविषयी तुमचा असलेला कळवळा हे पुतना मावशीच प्रेम आहे आणि ते आता समाजाच्या लक्षात आलेले आहे, अशा शब्दात शहर शिवसेनेने टीका केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पाटील हे ब्राह्मण समाजाच्या काही मंडळींना भेटून ‘मागच्या सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून ‘अमृत’ नावाने महामंडळ प्रस्थापित होते. महामंडळाचे नाव निश्चित झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रस्ताव बारगळला, अशी खोटी माहिती पसरवीत असल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकाद्वारे केला आहे.

गेली ७० वर्ष बहुतांशी ब्राह्मण समाज भाजपच्या मागे उभा होता. परंतु सातत्याने रेटून खोटे बोलून समाजाला फसवण्याच्या पलिकडे आपण त्यांना काही दिले नाही. त्यामुळे समाज आज अस्वस्थ आहे आणि तो शिवसेनेकडे सरकतो आहे. या भितीपोटी ब्राह्मण समाजाला पुन्हा एकदा फसविण्याचा प्रयत्न करीत आहात, असे सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाम देशपांडे, प्रशांत बधे, आनंद दवे आणि शिरीष आपटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT