ajay salunkhe 
पुणे

जुन्नरला झाड कोसळल्याने जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीवर वादळात झाड कोसळल्याने जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजय साहेबराव साळुंखे (वय १६), असे त्या नाव आहे.

अजय याचे आईवडील हयात नाहीत. त्यामुळे चुलतभाऊ त्याचा सांभाळ करत होता. तो जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत राहत होता. मात्र, काल झालेल्या वादळात त्याच्या झोपडीवर झाड कोसळले. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे रक्तस्राव झाला होता . त्याला मंचर येथे खाजगी रुग्णालयात दाखल  करण्यात  आले होते.त्याचा आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

शाळांचे वादळाने नुकसान
जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने 15 जिल्हा परिषद शाळांसह, माध्यमिक शाळा व आश्रमशाळांचे नुकसान झाले आहे. यात आदिवासी भागातील शाळांची संख्या अधिक आहे. शाळांचे पत्रे, कौल, छत, लोखंडी अँगल व पाईप, किट, किचन खोलीचे पत्रे, इमारतीवर झाडे पडणे, आदी नुकसान झाल्याचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होणार आहे. 

जुन्नर तालुक्यातील  खडकुंबे, चिंचेचीवाडी, निमगिरी, तळ्याचीवाडी, बारकी वसईवाडी, बोरीची वाडी, कवटेवाडी, बगाडवाडी, गोळेगाव, आळू, मुथाळणे, धावशी, सोमतवाडी, चिंचोली, डिंगोरे येथील जिल्हा परिषद शाळांचे एकूण ३६ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT