Pune By-Elections
Pune By-Elections esakal
पुणे

Pune By-Elections: चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? अजित पवारांची भूमिका महत्वाची

रुपेश नामदास

महाराष्ट्रातील दोन जगांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबापेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत.

दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे तर निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान आता भाजप समोर या पोटनिवडणूका बिनविरोध करण्याचं मोठ आव्हान असणार आहे.

चिंचवड विधानसभेसाठी याघडीला दिवंगत आमदार लक्ष्मन जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच नाव चर्चेत असल्याचे समजते. राष्ट्रवादीकडून अजून पर्यंत कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

मात्र गेल्या काही पोटनिवडणूकांचा अभ्यास केला असता ही जागा बिनविरोध होईल की नाही हे सांगू शकत नाही, कारण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवार देवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परिणामी ती जागा राष्ट्रवादीच्या हातून निसटली होती. या जागेमुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक आमदार कमी झाला.

जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मोठी भुमीका ठरू शकते. पवार यांचे जवळचे नेते म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. पक्षाने त्यांना अनेक मोठी पदं दिली, अलिकडेच अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला होता त्यावरून समजतं की जगताप आणि पवार यांचे संबंध कसे होते.

जर अजित पवार यांनी या रिक्त जागे बाबतीत हस्तक्षेप केला तर ही जागा बिनविरोध होवू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि विशेषता अजित पवार यांची भुमीका महत्त्वाची असणार आहे.

राजकीय विश्लेषक

ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण असं समोर येत की पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवार देवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती तर ती जागा राष्ट्रवादीच्या हातून निसटली त्यामुळे राष्ट्रवादी देखील चिंचवडच्या निवडणूकीत उमेदवार देवून ही जागा प्रतिष्ठेची करण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT