Circulars issued by the examination department on 100 percentage syllabus of backlog examinations 
पुणे

बॅकलाॅगच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर

सकाळवृत्तसेवा

पुणे  : अंतिम वर्ग वगळता इतर वर्षाच्या बॅकलॉग आणि श्रेणीसुधार परीक्षेसाठी शंभर टक्के अभ्यासक्रम असणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम पूर्व वर्षांची बॅकलॉग व श्रेणीसुधार परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. यामध्ये तीन ते सहा डिसेंबर या काळात सराव परीक्षा होईल तर, ८ ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यापीठाने मार्च २०२० पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली होती, त्यासाठी १०० टक्के अभ्यासक्रम नव्हता. त्यामुळे बॅकलाॅगच्या परीक्षेत संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. चार विद्याशाखेच्या अधिष्ठातांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या कोर्ससाठी किती अभ्यासक्रम असेल हे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल 

कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण, शिक्षण या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी शंभर टक्के अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातील. आर्किटेक्चरच्या अाॅड सेमिस्टरसाठी शंभर टक्के तर ईव्हन सेमिस्टर परीक्षेसाठी ८० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. इंजिनिअरिंगच्या २०१९ च्या पॅटर्नची परीक्षा प्रत्येक विषयाच्या चार धड्यांवर होणार आहे. तर इतर पॅटर्नची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होईल.
व्यवस्थापन, विधी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होईल असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, बॅकलॉकच्या किंवा श्रेणिसुधारच्या परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना महाविद्यालया पूर्ण शिकलेला आहे. त्यामुळे त्यांची परीक्षाही शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार असल्याचेही एका प्राध्यापकांनी सांगितले. 

कला, वाणिज्य, विज्ञान पदवी प्रथम वर्ष २०१३ पॅटर्न, बीएससी अॅनिमेशन प्रथम वर्ष २०१६ पॅटर्न, एलएलबी प्रथम वर्ष २०१७ आणि एमई (इलेक्टीव्ह) या अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर ८ ते २० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यासाठी महाविद्यालयातील पात्र प्राध्यापकांकडून प्रश्नसंच तयार करून घ्यावा. परीक्षेनंतर १० जानेवारी पर्यंत याचा निकाल परीक्षा विभागास सादर करावा, असे डॉ. काकडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT