CISCE_Results_2020
CISCE_Results_2020 
पुणे

CISCE result 2020: आयसीएसई आणि आयएससीचे निकाल जाहीर; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) वतीने घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेचा निकाल ९९.३४ टक्के, तर आयएससीचा (बारावी) निकाल ९६.८४ टक्के लागला आहे.  

देशात सीआयएससीईच्या दहावीच्या परीक्षेत एकूण २ लाख ६ हजार ५२५ तर बारावीत एकूण ८५ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दहावीचे २३ हजार ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बारावीचे ३ हजार १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

देशभरात आयसीएसई म्हणजेच दहावीला एकूण २,०७,९०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २,०६,५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयएससी म्हणजेच बारावीला एकूण ८८,४०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर राज्यात २३ हजार ३३६ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते, त्यातील २३ हजार ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर तीन हजार १५० विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा दिली, त्यापैकी तीन हजार १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीआयएससीईची दहावीची परीक्षा एकूण ६१ लेखी विषयांची होती, त्यात २२ भारतीय भाषा आणि ९ परदेशी भाषा होत्या. तर बारावीची एकूण ५१ विषयांची परीक्षा झाली, त्यात १५ भारतीय भाषा आणि ६ परदेशी भाषांचा समावेश होता.

शाळांची संख्या :

बोर्ड देश महाराष्ट्र
आयसीएसई २३४१ २२६
आयएससी ११२५ ५१

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT