corona 
पुणे

आंबेगावकरांनो सावधान, कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतोय 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले दहा रुग्ण आढळून आले आहेत. प्रथमच मंचर व अवसरी बुद्रुक या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 38 व रुग्ण आढळून आलेल्या गावांची संख्या १४ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची व प्रशासनाची धाकधूक वाढू लागली आहे.

पेठ येथे एकूण चार रुग्ण आढळून आले आहे. पूर्वी येथे दोन रुग्ण होते. आता रुग्णांची संख्या सहा झाली. निरगुडसर येथे हे चार रुग्ण आढळून आले असून, येथे एकूण रुग्णांची संख्या पाच झाली आहे. मंचर शहरात व अवसरी बुद्रुक येथे प्रत्येक रुग्ण प्रथमच आढळल्यामुळे या दोन्ही गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

विशेषता मंचर ही तालुक्याची बाजारपेठ आहे. येथे तालुक्यातील 104 गावांचा दैनंदिन संपर्क येतो. गेली दोन महिने लॉकडाउनची प्रभावपणे अंबलबजावणी केली होती. पण, मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील पत्नी पॉझिटिव्ह आली आहे. मंचर ग्रामपंचायतीने या महिलेला मंचर गावाच्या पूर्वेला एकांतात पोल्ट्री ठेवले होते. 

निरगुडसर, पेठ, अवसरी बुद्रुक, मंचर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनातील अधिकारी व संबंधित ग्रामपंचायती करत आहेत. त्यामुळे किमान वीस ते पंचवीस जणांचे नमुने घेतले जाणार असून, ते तपासण्यासाठी पुण्याला पाठविले जाणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. 

अधिकारी वर्गाकडून  खबरदारीचा उपाय म्हणून अवसरी बुद्रुक व मंचर ही दोन्ही गावे हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पण, मंचरपासून पूर्वेला ३ किलोमीटर अंतरावर सदर रुग्ण आढळून आला. त्यामुळे सदर भाग फक्त सील करावा, अशी मागणी ग्रामस्त व व्यापाऱ्यांनी केली आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्यामुळे अधिकारी वर्ग चिंतेत आहेत. त्यामध्येच भर म्हणून बुधवारी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून नियोजन सुरु केले आहे. कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही संकटाशी आंबेगाव करांना सामना करण्याच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT