kothrud123.jpg 
पुणे

Video : बॅरिकेडस पुन्हा लावल्याने कोथरुडकर उतरले रस्त्यावर...

समाधान काटे

मयूर काॅलनी (पुणे) : पूर्वसूचना न देता बॅरिकेडस लावण्याची मोहिम प्रशासनाने सुरू केल्याने शुक्रवारी दुपारी कोथरूडच्या झोपडपट्टी परिसरात संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून असंतोष प्रकट केला. म्हातोबानगर, सुतारदरा, पेठकर साम्राज्य या परिसरातील सुमारे पाचशे लोक रस्त्यावर आले. पोलिसांशी हुज्जत घालून त्यांनी तासभर आंदोलन केले.

बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला. त्यात रिक्षाचालक, हमाल, घर काम करणा-या महिला, रोजंदारी करणारे कामगार यांचा समावेश होता. सचिन गायकवाड, शाम केळकर, आनंदा भगत, अप्पा म्होकर, गजानन पोळेकर, विकास वाळुंजकर यांनी पोलिसांसमोर नागरिकांची बाजू मांडली. दोन दिवसांपूर्वी या परिसरातील बॅरिकेड्स काढल्याने नागरिक मोठ्या संख्येने कामावर जाऊ लागले होते.

रिक्षाचालकही गाड्या दुरूस्त करून व्यवसाय सुरू करण्याच्या टप्यात होते. घर काम करणा-या महिलाही कामावर जात होत्या. जनजीवन सुरळीत होत असताना आज दुपारी अचानक रस्ते बंद करण्याची मोहिम प्रशासनाने उघडली. पूर्वसूचना न देता लाॅकडाउन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोसायट्यांना वगळून झोपडपट्ट्यांना लक्ष केले जात आहे. घरात रेशन नाही. पुरेसे अन्नधान्य नाही. उपासमार होते आहे. त्याकडे लक्ष न देता अचानक रस्ते बंद केल्यास प्रशासनास तीव्र असंतोषास सामोरे जावे लागेल. अशा भावना नागरिकांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केल्या.

स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांना फोन लावण्यात आला. त्यांच्या पीएने या विषयावर बोलण्यास असमर्थतता दर्शविली. लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. वरिष्ठ पोलिस अधिकारी फोन उचलत नाहीत. असा आरोप या नागरिकांनी केला. केळेवाडी. सुतारदरा येथे करोनाचे रूग्ण सापडल्याने प्रशासन कठोर पावले उचलत आहे, अशी माहिती उपस्थित पोलीसांनी दिली. त्याचा तपशील मात्र ते देऊ शकले नाहीत.

 

कोरोनाचे रूग्ण वाढाले आहेत. त्यामुळे परिसरात जाणे- येणे बंद केलं आहे. लाकडी बांबू व पत्रे लावून परिसर बंद करत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची दुकाने सुरू राहतील.
  - संदिप कदम, सहाय्यक आयुक्त कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT