corona 
पुणे

कोरोनामुक्त भोरमध्ये मुंबईहून आलेल्या कुटुंबातील... 

विजय जाधव

भोर (पुणे) : कोरोनामुक्त झालेल्या भोर तालुक्‍यात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. नीरा देवघर धरण खोऱ्यातील रायरी येथील 36 वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

संबंधीत तरुण हा पत्नी व मुलीसह चार दिवसांपूर्वी मुंबईहून रायरीत आला आहे. त्यांना प्रशासनाने शाळेच्या खोलीत क्वारंटाइन केलेले आहे. संबंधीत तरुणास सर्दी असल्यामुळे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा पॉझिटीव्ह अहवाल गुरुवारी (ता. 21) दुपारी आला. त्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. 

तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे आदी आरोग्य, महसूल, पंचायत समिती, शिक्षण व पोलिस या विभागातील कर्मचाऱ्यांसह रायरीत पोहोचले आहेत.

प्रशासनाने हायरीस्क असलेल्या रायरीमधील 11 आणि कंकवाडीतील दोन जणांना पुण्याला पाठविले आहे. रायरी गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे तालुका पुन्हा रेडझोनमध्ये जाणार असून, लॉकडाउनचे नियम पुन्हा कडक करण्यात येणार आहेत. तालुक्‍यात येणाऱ्या प्रत्येकास संस्था क्वारंटाइन केले जाणार आहे. 

तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास गावात न पाठवता संस्था क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. चोरट्या मार्गाने जरी एखाद्याने गावात प्रवेश केला, तरीही त्यास भोरला आणून संस्था क्वारंटाइन करण्यात येणार आहे. भोरमध्ये एक हजार जणांना संस्था क्वारंटाइन करण्याची तयारी पूर्ण झाली असून, सध्या 30 जण संस्था क्वारंटाइनमध्ये आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT