printing 
पुणे

कोरोनाने असे बिघडवले प्रिंटिंग व्यवसायाचे गणित 

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : कोरोनामुळे सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे छपाई व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील सुमारे 300 छपाई व्यवसायिक आणि या व्यवसायावर अंवलबून असणाऱ्या सुमारे 1500 ते 1800 कामगार आता संकटात सापडले आहेत. सध्या ठप्प झालेला हा व्यवसाय पुन्हा उभारी घेईल की नाही, याचीच चिंता आता त्यांना सतावत आहे.

छपाई व्यवसायाची संपूर्ण वर्षाची आर्थिक गणिते ही लग्नसराईवर अवलंबून असतात. मार्च, एप्रिल, मे, जून आदी महिन्यांत होणाऱ्या लग्नांवरच या व्यवसायाची भिस्त मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या लग्नसराईच्या हिशोबाने छपाई व्यवसायिक लग्नपत्रिकेचा कच्चा माल खरेदी करून ठेवतात. त्यासाठी खूप मोठे भांडवल गुंतविले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे लग्नाचा हंगामच कोरडा गेला. त्यामुळे गुंतवलेले भांडवल तसेच पडून आहे.          

जूनमध्ये शाळा सुरू होतील, मग दरवर्षीप्रमाणे शाळांची कामे मोठ्या प्रमाणावर मिळतील, अशी आशा छपाई व्यवसायिकांना होती. मात्र, कोरोनामुळे शाळाही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांची छपाईची कोणतीच कामे मिळाली नाहीत. त्यानंतर गणेशोत्सवामध्ये गणपती मंडळांचे अहवाल आणि पावती पुस्तके आदी कामे असतात. मात्र, गणेशोत्सवावर देखील मर्यादा आल्या. त्यामुळे गणेशोत्सव काळातील व्यवसाय देखील झाला नाही. त्यातून आता छपाई व्यवसायिकांची संपूर्ण वर्षाचीच आर्थिक गणिते पूर्णतः कोलमडून गेली. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या तरी खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील छपाई व्यवसायिकांच्या हातात कोणतेच मोठे काम नाही. त्यांच्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे उभारलेल्या प्रिंटिंग क्लस्टरचे काम देखील ठप्प झाले आहे. एकंदरच या चारही तालुक्यातील छपाई व्यवसायिकांच्या वर्षाला होणाऱ्या काही कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही काळ छपाई व्यवसायाची घडी पूर्ववत बसण्याची शक्यताही फारच कमी असल्याचे छपाई व्यवसायिक बोलून दाखवत आहेत. 

सध्या तरी छपाई व्यवसायिक पूर्णपणे हतबल झाले असून, त्यांची अवस्था फारच बिकट झालेली आहे. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे कर्ज हप्ते, वीज बील,  कामगार पगार आदी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे कर्ज, व्याज व वीज बिलातून सूट मिळावी, व्यवसायात पुन्हा उभारी घेता यावी, म्हणून तातडीने पतकर्ज किंवा खेळते भांडवल बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत छपाई व्यवसायिकांना मिळावे.
 - सोमनाथ गोरे, संस्थापक- अध्यक्ष, भीमाशंकर प्रिंटिंग क्लस्टर, पेठ (ता. आंबेगाव)

कोरानामुळे छपाई व्यवसाय पूर्णतः अडचणीत आला आहे. गणेशोत्सवात चांगला धंदा होईल, असे वाटत होते. मात्र, आता तर दिवसाला होणारा एक ते दोन हजार रूपयांचा धंदाही मंदावला आहे. मासिक भाडे काढणेही मुश्कील झाले आहे. निदान आता दिवाळीपर्यंत तरी आमचा व्यवसाय सुरळीत होईल, हीच अपेक्षा आहे.
 - सतीश कोल्हे, संस्थापक- अध्यक्ष, जुन्नर तालुका प्रिटींग प्रेस असोसिएशन              

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT