dragon.jpg 
पुणे

कोरोनामुळे 'ड्रॅगन' खातेय भाव...

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा ड्रॅगन फळाला चांगली मागणी वाढली आहे. नागरिकांकडून सध्या रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. ड्रॅगन फळ प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या फळाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. बाजारात ड्रॅगन फळाचा हंगाम सुरू झाला आहे. मागणी अधिक आणि आवक कमी आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव तेजीत आहेत.

ड्रॅगन फळाचा हंगाम जून ते ऑक्टोबरपर्यंत असतो. मात्र यंदा हंगाम उशीराने सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील फळ विभागात ४ ते ५ टन आवक होत आहे. ही आवक सोलापूर, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. येत्या 15 दिवसांत आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हंगाम बहरात आल्यानंतर रोज 8 ते 10 टनापर्यंतची आवक होते. अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

सुपेकर म्हणाले, लाल आणि पांढरा अशा दोन प्रकारचे हे फळ असते. पांढर्‍या फळापेक्षा लाल फळाला अधिक मागणी असते. तसेच दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू येथूनही या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास हे फळ उपयुक्त ठरते. त्यामुळे या फळाला बाजारात कायमच मागणी असते.

ड्रॅगन फळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 20 टक्के भाव वाढ झाली आहे. या हंगामात कोरोनामुळे भावात तेजी कायम राहील.
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड.


ड्रॅगन फळाचे किलोचे दर
ड्रॅगन फळ-  घाऊक दर  -  किरकोळ दर
लाल फळ-   120 ते 150    - 200
पांढरे फळ-   60 ते 100      - 150

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur: लाच घेताना दुय्यम निबंधक, ऑपरेटर अटकेत

Nagpur: महिला बचत गटांना एक हेक्टर पडीक जमीन देणार, रोजगार निर्मितीसाठी महसूल विभागाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज येणार रत्नागिरीत; ठाकरे गटातील नेत्यांचा पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT