corona1 
पुणे

दौंड शहरातील या रूग्णालयातील कर्मचाऱ्यासही कोरोनाची बाधा

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरातील उप जिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यास बाधा झाली आहे. शहरातील सात व तालुक्यातील आठ, असे एकूण १५ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ५ वर्षाच्या मुलीपासून ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे.

कोणाच्याही संपर्कात नाही तरीही कोरोना पाॅझिटिव्ह
                    
दौंड शहरातील उप जिल्हा रूग्णालयाकडून ४८ जणांचे घशातील स्त्राव (स्वॅब) तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २२ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार ७ जणांना बाधा झाली असून, त्यामध्ये २ पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे. बाधितांमध्ये उप जिल्हा रूग्णालयातील महिला कर्मचारी आणि कुंभार गल्ली येथील एका कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. या बाधितांचे वय १३ ते ६० या दरम्यान आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

पोलिस काढणार रेखचित्रातून आरोपींचा माग, पाच दिवसांचा कोर्स
                    
दौंड तालुक्यात पाटस येथे २ आणि देलवडी, भांडगाव, पडवी, कुरकुंभ, बोरीबेल व सोनवडी येथे प्रत्येकी १, असे एकूण ८ जणांना बधा झाली आहे. तालुक्यात २५ मे २० जुलै या कालावधीत दरम्यान एकूण १५ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, बाहेर गेल्यावर शारीरिक अंतर राखणे, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छतेचे नियम पाळणे, ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनी तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे आणि घरी राहणाऱ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी केले आहे. 

चार दिवसांत ९४ बाधित 
दौंड तालुक्यात १९ ते २२ जुलै या कालावधीत तालुक्यातील ६१ व शहरातील ३३, असे एकूण ९४ जणांना बाधा झाली आहे. दौंड तालुक्यात शहरातील ७६ व तालुक्यातील ९४, असे एकूण १७० बाधितांवर उपचार सुरू आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live-in Relationship Rule: महत्त्वाची बातमी! लिव्ह-इन रिलेशनशिपबाबतचे नियम बदलले; राज्य सरकारची मोठी घोषणा, नवे नियम काय?

किती गोड! 'दशावतार' पाहिल्यावर चिमुकल्या चाहतीने चित्रपटातील माधवकडे मागितलं हे गिफ्ट; अभिनेता व्हिडिओ करत म्हणतो-

Pune Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूलाजवळ भीषण अपघात! , दोन ट्रकची धडक, कार जळून खाक ; सात जणांचा मृत्यू

DMart : डीमार्टमधली चोरी थांबवण्यासाठी कंपनीने केली भन्नाट आयडिया; तुम्ही चुकूनही या ट्रॅपमध्ये अडकू नका..खरेदीला जाण्यापूर्वी हे बघाच

Latest Marathi Breaking News Live : आरजेडी नेते सुनील सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT