corona 
पुणे

एटीएममधून पैसे काढल्यानंतर सुरू झाला त्रास, कोरोनाची टेस्ट केली तर...

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ-सैदवाडी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोणाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील ६ जणांना भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन केले आहे. तर, उर्वरीत १२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांना संसर्ग होऊ लागल्याने ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत.  

मंचर पोलिस ठाणे, महाळुंगे पडवळ ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती, तहसील कार्यालय घोडेगाव आदी कार्यालयांमार्फत गावात चांगल्या उपाय योजना केल्या होत्या. मंचर पोलिस ठाणे व पोलिस पाटील यांच्यामार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या काटेकोरपणे नोंदी घेऊन त्यांना होम क्वारंटाइन केले जात होते. आरोग्य केंद्रातील कर्मचारी जनजागृतीचे काम करत होते. परंतु, चार ते पाच दिवसांपूर्वी मंचर येथील एका व्यापाऱ्याकडे येथील तरुण वस्तू खरेदीसाठी व नामांकित बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यानंतर तरुणाला थकवा व अंग दु:खीचा त्रास जाणवू लागला होता. महाळुंगे पडवळ येथील एका खासगी दवाखान्यात त्याने उपचार देखिल घेतले होते. महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तरुणाच्या घशाचा नमुना कोवीड १९ तपासणीसाठी पाठविला होता. नुकताच तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मंचर परिसरातच तरुणाला लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तरुणाच्या संपर्कातील 6 कुटुंबियांना मंचर- घोडेगाव रस्त्यावरील भीमाशंकर हॉस्पिटल येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, उर्वरीत १२ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यांचे कोवीड १९ चे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. २४ तासानंतर सदर अहवाल प्राप्त होतील. या तरुणाच्या घराचे ग्रामपंचायतीमार्फत निजंतुकीकरण केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सैदवाडीकडे येणारे रस्तेही बंद करण्यात आले असून गावातील दुकाने व्यावसायिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद केली आहेत. पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस नाईक राजेंद्र हिले आदींनी पाहणी केली आहे.

सर्दी, खोकला, घसा दु:खी, ताप व अंग दु:खी असणाऱ्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशिष गिते व आरोग्य सहाय्यक डॉ.भास्कर साबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT