coronavirus pune city it hub salary cut off
coronavirus pune city it hub salary cut off 
पुणे

चिंता वाढली : पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात?

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरं आयटी हब म्हणून उदयाला आली. हिंजवडी, खराडी, वाकड, तळेगाव, मगरपट्टा सिटी, बाणेर, अशा परिसरात पुण्यातली आयटी इंडस्ट्री विखूरलेली आहे. प्रामुख्यानं विदेशातील प्रोजेक्ट्सवर अवलंबून असलेल्या या आयटी इंडस्ट्रिला कोरोना व्हायरस आणि त्यामुळं आलेल्या लॉकडाउनमुळं ब्रेक लागलाय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सगळ्यांवरच टांगती तलवार
सध्या लॉकडाउनमुळं पुण्यातल्या आयटी इंडस्ट्रितलं काम जवळपास ठप्प आहे. काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम सुरू ठेवलंय. पण, अनेक कंपन्यांकडचे प्रोजेक्ट्स गेल्या काही दिवसांत धडाधड बंद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर एक प्रकारची टांगती तलवार आली आहे. नोकरी टिकणार की जाणार, ही एक चिंता अनेक आयटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यातच पुण्यात आयटीतील अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवायला सुरुवात केलीय. एखादा प्रोजेक्ट येण्याची शक्यता गृहित धरून करण्यात आलेल्या नेमणुका कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. या कंपन्या बेंच रिसोर्स म्हणून, काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात, अशा कर्मचाऱ्यांनी घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. 

आहे ते चालवा फक्त 
मुळात पुण्यातल्या आयटी क्षेत्रात प्रामुख्यानं डेव्हलपमेंटची कामं होत असतात. आता सध्या विदेशातून येणाऱ्या कामांमध्ये खूप बदल अनुभवला येत आहेत. भारतातल्या आयटी क्षेत्रात अमेरिका आणि ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणावर काम मिळतं. जगात या दोन देशांना कोरोनाचा सर्वांत मोठा फटका बसलाय. लॉकडाउनमुळं तिथल्या अर्थव्यवस्थेला दणका बसलाय. परिणामी अमेरिकेत फंड्स कमी पडत असल्यामुळं नवे प्रोजेक्ट्स बंद झाल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तरुण देत आहेत. सध्या अमेरिका आणि ब्रिटनमधून आहे त्या परिस्थितीत बिझनेस रन होण्यासाठीचे प्रोजेक्टसच सुरू ठेवण्यात आले आहेत. एखाद्या प्रोजक्टमधील दुरुस्त्या किंवा डिजिटलमध्ये यूजर फ्रेंडली अनुभव मिळण्यासाठीचे बदल बंद करण्यात आले आहेत. जे आहे ते सध्याच्या स्थितीत चालवा, असा जणू मेसेज देण्यात आलाय. 

पगाराला कात्री
पुण्यात काही कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय घेतलाय. आयटी क्षेत्रातील नोकरदारांचे पगार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला आता कात्री लावली जात आहे. काही कंपन्यांनी 25 टक्के पगार कपात केल्याची माहिती मिळत आहेत. अर्थातच अलाउंन्स आणि पगारवाढ हा विषय किमान काही महिने चर्चेसाठी येणार नसल्याचं नेट सांगितलं जात आहे. 

हैदराबादमध्ये मोठी कपात 
भारतातल्या आयटी क्षेत्राची त्या त्या शहरानुसार वेगवेगळी ओळख आहे. सध्या पुण्यात डेव्हलमेंटची कामं जास्त होताना दिसतात. तर हैदराबाद सारख्या शहरात बीपीओ, केपीओ हा आयटी इंडस्ट्रिचाच एक भाग मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पुण्यात कामगार कपातीची उदाहरणं हळू हळू दिसू लागली असली तरी, हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार कपातीला सुरुवात झाल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तरुण देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT