Murlidhar_Mohol 
पुणे

पुणेकरांनो, आता सिंहगड कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर होणार सुरू; महापौरांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

धायरी (पुणे) : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात तीन हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत होते, मात्र हा आकडा आता तीस हजारांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं, यासाठी पुण्यात चोवीस तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली. 

महापौर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे, ''सध्या शहरात १०९ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरात लवकर कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खासगी हॉस्पिटलमधील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडे ५ हजार पाचशे बेड उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी शहरात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. शहराच्या प्रत्येक भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुतार हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल या केंद्रांवर प्रामुख्यानं २४ तास लसीकरण सुरु राहील.''

लायगुडे हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि उपलब्ध लसींचा साठा यात तफावत होती. लस कमी पडत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना महापौर म्हणाले की, ''केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून महापालिका लस पुरवठा वाढवून घेण्यावर भर देत आहे. पुण्यात कोणत्याही हॉस्पिटलची जेवढी मागणी असते, त्याप्रमाणे तिथे कोरोना लसीचा साठा पुरवण्यात येत आहे.''

सिंहगड कॉलेजमध्ये लवकरच कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. याविषयी संस्था चालकांच्या सोबत बोलणे सुरू आहे. लवकरच याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू होईल, असे महापौर मुरलीधर मोहळ यांची सांगितले.

ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत पण ते घरात क्वारंटाईन राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कोविड केअर सेंटर्स' पुण्यातील येरवडा, खराडी, चंदननगर, कोंढवा या भागात एक हजार बेड्स उपलब्ध झाले आहेत. पुण्याच्या सर्व भागात 'कोविड केअर सेंटर्स' उभे करावेत आणि साधारण पाच हजार बेड्सचं नियोजन असल्याचंही महापौर यांनी यावेळी सांगितलं. शिवाय सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर्षीप्रमाणे लवकरच 'कोविड केअर सेंटर' सुरु होणार आहे. बालेवाडीला साडेआठशे बेड्सचं 'कोविड केअर सेंटर'काम सुरु आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT