Unemployment 
पुणे

दरमहा 10 हजार स्टायपेंड अन् मोफत प्रशिक्षणही; तरुणांसाठी आहे रोजगाराची संधी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम क्षेत्रात प्रशिक्षण देऊन हमखास रोजगार मिळवून देणाऱ्या क्रेडाईच्या कुशल उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या दहा दिवसांत सुमारे 300 युवकांनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण कालावधीत दरमहा 10 हजार स्टायपेंड युवकांना दिला जात आहे.

बांधकाम क्षेत्रातील मजुरांचे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे मनुष्यबळाची सध्या तुटवडा भासत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेने कुशल उपक्रम सुरू केला आहे. त्यातंर्गत चौथी किंवा पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकाला बांधकाम क्षेत्रातील विविध प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. सुमारे दोन महिने त्याचा कालावधी असतो.

या काळात त्याला दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंड म्हणून दिला जातो. तसेच त्याची राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाते. या युवकांचे प्रशिक्षण झाल्यावर त्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाते. त्यातून त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळविणे शक्य होते, असे क्रेडाईकडून सांगण्यात आले. राज्यातील कोणत्याही युवकाला या उपक्रमात भाग घेणे शक्य आहे. 

प्लंबिंग किंवा इलेट्रिकचा डिप्लोमा झालेल्या युवकांनाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ही संधी या उपक्रमात मिळणार आहे, असे क्रेडाईकडून सांगण्यात आले. तसेच कुशल आणि अकुशल या दोन्ही प्रकारांत युवकांना रोजगाराची संधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाउनच्या काळात बांधकाम क्षेत्र बंद होते. परंतु, आता बांधकामे काही प्रमाणात सुरू झाली आहेत. परंतु, कामगारांची टंचाई भासत असल्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या बाबत अधिक तपशील हवा असल्यास संबंधित युवकांनी 8390902500 किंवा 9767645589 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन क्रेडाईने केले आहे. 

कायम रोजगाराची चांगली संधी    
या बाबत क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे प्रमुख जे. पी. श्रॉफ म्हणाले, बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशिक्षण काळात स्टायपेंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असल्यामुळे युवकांना सोयीचे होऊ शकते. प्रशिक्षणानंतर चांगला प्रकारचा रोजगार मिळत असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Latest Marathi News Live Update : आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

LPU ची शैक्षणिक क्रांती! २.५ कोटींचे पॅकेज, इंडस्ट्री-बेस्ड डिग्री आणि 'ग्लोबल टेक इमर्शन'सह इंजिनिअरिंग शिक्षणाला दिली नवी दिशा

SCROLL FOR NEXT