marriage 
पुणे

लग्न लावले थाटात, पोलिसांनी काढली कार्यमालकांची वरात

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियम व अटींचे पालन न करता जास्त वऱ्हाडी मंडळींची गर्दी करून विवाह केल्याबद्दल जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द येथील दोन कार्यमालकांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

नारायणगाव येथील व्यापाऱ्याने आपल्या घरातील थाटामाटात केलेल्या विवाहामुळे वधू, वर, वरपिता, फोटोग्राफर यांच्यासह तेवीस जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना तीच चूक बोरी खुर्द येथील दोन कार्यमालकांनी केली आहे. या प्रकरणी कार्यमालक चंद्रकांत विष्णू पटाडे व रूपेश बबन पटाडे (दोघेही राहणार बोरी खुर्द, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना व प्रशासनाने सक्त ताकीद दिली असतानाही जास्त लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची हौस काही पूर्ण होत नाही. आजअखेर एकूण चार कार्यमालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या दोन विवाह सोहळ्यामुळे सुमारे साठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गुन्हा दखल करूनही कार्यमालकांनी हम नही सुधरेंगे, अशी भूमिका घेतल्याने प्रशासन हतबल झाले आहे. बेजबाबदार व्यक्तींमुळे कोरोना समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. जुन्नर तालुक्यात आजअखेर कोरोना रूग्णांची एकूण संख्या १ हजार १२४ झाली असून, ४५ जण मृत झाले आहेत.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गुंड म्हणाले की, कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाल्याने नारायणगाव, वारुळवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तर पाच किलोमीटर परिसर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नियम व अटींचे पालन करून विवाह करण्यास जास्तीत जास्त वीस लोकांची मर्यादा आहे.अ से असताना ३० ऑगस्ट रोजी बोरी खुर्द येथील चंद्रकांत पटाडे व  रूपेश पटाडे या दोन कार्यमालकांनी आपल्या पाल्यांच्या विवाहासाठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून दोन्ही कार्यमालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT