पुणे

पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सिंहगड रस्त्यासह कात्रज, धनकवडी आणि कोंढवा परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्यासाठी कात्रजमध्ये नव्याने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे या भागांतील रहिवाशांना आता आठवड्यातील सातही दिवस पाणीपुरवठा होणार आहे. पुढील काही दिवस टाकी आणि नव्या जलवाहिन्यांच्या तपासण्या करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

सिंहगड रस्त्याच्या काही भागांसह शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज-कोंढवा रस्ता आणि या भागांच्या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या परिसरातील लोकवस्त्या, त्यानुसारची पाण्याची मागणी आणि तो पुरवठा करणारी यंत्रणा पाहता आठवडाभर रोज पाणीपुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण देत या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाते. त्यातच देखभाल-दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास या भागांतील पाणीपुरवठा सलग दोन-दोन दिवस विस्कळीत होतो. त्यामुळे हाल होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या भागांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कात्रजमधील महादेवनगरमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. पुढील काही दिवसांत नव्या टाकीतून पाणीपुरवठा होईल. त्यानंतर नागरिकांना रोज पाणी मिळेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT