COPD 
पुणे

घरोघरी होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे धोका

अक्षता पवार

‘सीओपीडी’मुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू; पुणे जिल्ह्यातील नागरिक मात्र अनभिज्ञ
पुणे - देशात ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या आजाराने दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरोघरी होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते. परंतु, साक्षरतेत अग्रक्रमावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिक या आजाराबाबत साक्षर नसल्याचे स्पष्ट झाले. चुलीचा धूर, मॉस्किटो कॉईल यांसारख्या गोष्टींमुळे होणाऱ्या या आजाराबाबत ९९ टक्के नागरिकांना माहितीच नसल्याची धक्कादायक बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेस्ट रिसर्च फाउंडेशन व भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या अभ्यासाची माहिती नुकतीच ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली आहे. पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन (प्युअर) फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक दिशा घोरपडे, महाराष्ट्र आरोग्य सेवेचे माजी संचालक डॉ. प्रकाश डोके, प्युअर फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी आदींनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्ह्यातील झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागात ‘सीओपीडी’ संबंधित जनजागृती आहे काय?, याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यात फक्त ०.९ टक्के नागरिकांनीच सीओपीडीबाबत ऐकल्याचे स्पष्ट झाले. 

असा झाला अभ्यास 

  • जिल्ह्यातल्या शहरी भागातील १३ झोपडपट्टी व ७ गावांचा अभ्यास केला.
  • यामध्ये पाच हजार ४२० नागरिकांचा सहभाग
  • यात ६१ टक्के महिलांचा सहभाग

निष्कर्ष

  • केवळ ०.९ टक्के नागरिकांना सीओपीडीबाबत माहिती
  • कोणत्या अवयवावर परिणाम होतो, याबाबत २८ टक्के नागरिकांना माहितीच नाही 
  • माहिती नसल्यामुळे आजाराचे निदान वेळेवर होत नाही
  • घरात होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा अधिक

काय आहे ‘सीओपीडी’ ?
सीओपीडीमुळे श्र्वास नलिकेच्या शेवटी असलेल्या फुग्यांवर (एअर सॅक) परिणाम होतो. त्यामुळे पर्याप्त ऑक्सिजन शरीराला मिळत नाही. तसेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. शरीराला लागणारी ऊर्जा ही ९० टक्के ऑक्सिजनमुळे निर्माण होते. त्यामुळे या आजाराचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच नाही तर इतर अवयवांवरही होतो. तर एचआयव्ही एड्स, टीबी, हिवताप आणि मधुमेह या सर्व आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत ‘सीओपीडी’मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे छातीरोगतज्ज्ञ व प्युअरचे फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवे यांनी सांगितले.

देशात सीओपीडीबाबत जनजागृती करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलण्याची आवश्‍यकता आहे. तर देशातील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. चूल पेटवणे, मच्छरसाठी जाळले जाणारे कॉईल, धूम्रपान अशा विविध कारणांमुळे घरातील वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. लोकांमध्ये याची जनजागृती करण्याची गरज आहे.
- दिशा घोरपडे, प्रकल्प व्यवस्थापक, प्युअर फाउंडेशन

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कार्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य! GNCTD आणि MCD मध्ये मोठा बदल; दिल्ली सरकारचा महत्त्वाचा निर्णय

KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Video

Tahsildar Rakesh Gidde Death : कष्टाने ‘तहसिलदार’ झाला पण, अर्ध्यावर डाव मोडला! राकेश गिड्डे यांच्या निधनाने सांगलीकर भावूक

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

SCROLL FOR NEXT