Pune-Market-Yard 
पुणे

पुणे : भुसार बाजार लवकरच सुरू होणार; मात्र मर्यादित मालाची होणार आवक!

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात धान्य आणि किराणा माल मर्यादित मागवून सोमवार (ता.२५) पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शनिवारी (ता.२३) चेंबरच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

व्यापारी सभासदांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, नगरसेवक प्रविण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, सुभाष पालरेचा उपस्थित होते.

ओस्तवाल म्हणाले, ''गूळ-भुसार विभागातील जवळपास १५ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच यामध्ये दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी मागील दोन महिने नियमित बाजार सुरू ठेवला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी, पणन संचालक, बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांचे कौतुक केले.''

व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाची साखळी तुटावी यासाठी मंगळवारपासून पाच दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. या काळात बाजार समितीने संपूर्ण बाजारस्थळाचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शरीरातील तापमान तपासणीसाठी थर्मल गण, सॅनिटायझर, बाधित परिसरातील लोकांना बाजारात प्रतिबंध आदी उपाययोजना केल्या असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.

गर्दी कमी करण्यासाठी बाजारातील व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावे. तसेच मालाची ऑर्डर ई-मेल आणि फोनद्वारे घेऊन माल टेम्पोद्वारे पोहचं करण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होण्यास मदत होईल.
- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंंट्स चेंबर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT