पुणे : लॉकडाऊनचा फटका टेमघर दुरस्तीला ही बसला आहे. त्यामुळे या धरणाच्या दुरूस्तीचे काम मे महिना अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन होते. धरण दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात असले तरी या महिन्याच्या अखेरीत ते पूर्ण होऊ शकणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम आणखी काही महिने लांबणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक धरण आहे. या धरणाच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 13 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे हे काम बंद ठेवण्यात आले होते. आता जलसंपदा विभागाला काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांनुसार धरण दुरुस्तीच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून हे काम सूरु करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू
काय काम सुरू आहे.
सध्या धरणाचे दुरूस्तीचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू आहे. या टप्प्यात भिंतीची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरण केले जाणार आहे. यामुळे धरणातील गळती थांबण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान व साहित्य सामुग्रीचा वापर दुरूस्तीच्या कामासाठी करण्यात येत असून एवढ्या मोठया प्रमाणात धरणाची दुरुस्ती करण्याची राज्यासह देशात ही पहिलीच घटना आहे. केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्र (सीडब्लूपीआरएस) यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून याकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे.
शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू
कशाप्रकारे काम केले जात आहे.
धरण दुरुस्तीच्या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलींग व ग्राऊटींग या पध्दतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशाच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडले जाते. यानंतर या छिद्रामध्ये सिमेंट, सिलीका, फ्लॅश ऍशसोबतच दोन द्रवस्वरुपातील पदार्थ असे एकूण सहा पदार्थ्यांचे मिश्रण या छित्रामध्ये प्रेशरच्या सहाय्याने सोडले जाते. त्यामुळे गळती थांबण्यास मदत होते. धरण दुरुस्तीचा हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.