jee and neet.jpg 
पुणे

जेईई, नीट अभ्यासक्रमास विना सीईटी प्रवेश द्या; पहा कोणी केली मागणी

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची (सीईटी) प्रवेश परिक्षा झालेली नाही. सध्या एमबीए 
अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पदवीच्या गुणांवर आधारित प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठीही विद्यार्थ्यांना बारावी परिक्षेच्या गुणांच्या आधारावर प्रवेश द्यावा अशी मागणी फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्सिंग टेक्निकल इन्स्टिटयूशन्स या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्यांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शंभर टक्के जागा या भरल्या जात नाहीत अशी स्थिती मागील काही वर्षांमध्ये आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटांमुळे राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षा अद्याप झालेल्या नाहीत तर अनेक विद्यार्थी या परिक्षांचे फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले आहेत. सुप्रिम कोर्टाने जेईई व नीट परिक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीसाठी जेईई व औषधनिर्माणशास्त्रसाठी नीट ही प्रवेश परिक्षा ग्रहीत धरण्यात यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या परिक्षांचे फॉर्म भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर आधारीत प्रवेश देण्यात यावेत अशी करण्यात येत आहे. 

सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश परिक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही पदवी परिक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू करावा अशी विदयार्थी, पालक व शैक्षणिक संस्थाची मागणी आहे. याबाबत फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्सिंग टेक्निकल इन्स्टिटयूशन्स या संस्थेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे केली आहे.

याबाबत स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, देशातील महाराष्ट्र व पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यामध्ये विना सीईटी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रामध्ये अभियांत्रिकीच्या जागा दरवर्षी भरल्या जात नसतानाही सीईटीची सक्ती केली जात आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे व व्यवस्था नसल्यामुळे सीईटी देता येणे शक्य होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांची इच्छा व पात्रता असतानांही केवळ शासकीय धोरणांमुळे प्रवेशापासून वंचित राहतात. चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए अभ्याक्रमासाठी सीईटीची अट रद्द केली आहे त्याचप्रमाणे अभियांत्रिकी व औधषनिर्माणशास्त्रसाठीही सीईटी रद्द करुन बारावी परिक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश द्यावा अशी मागणी फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्सिंग टेक्निकल इन्स्टिटयुशन्स करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीईटीसाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ :
देशात व राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. अशावेळी राज्याची सीईटी, केंद्राची सीईटी अशा वेगळया प्रवेश परिक्षांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो. चालू शैक्षणिक वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या जेईई प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी व नीट प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून औषधनिर्माण अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यात यावेत. एमबीएसाठी प्रवेश परिक्षा रद्द केली आहे तोच नियम इतर अभ्यासक्रमांनाही लावावा. अनावश्यक सीईटीचा आग्रह हा विदयार्थ्यांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT