mu.jpg 
पुणे

'...अन्यथा विवेकवादी विचारांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही'

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सात वर्षे झाल्यानंतरही सीबीआयचा या गुन्ह्याबाबत तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. हत्येमागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, असे मत मुक्ता दाभोलकर व डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला आहे. 

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्रे  चारही गुन्ह्यामध्ये वापरलेली आहेत. या प्रकरणी  सीबीआयने काही आरोपींना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. 
आतापर्यंत झालेल्या तपासात या केवळ खुनाच्या  घटना नसून हे दहशतवादी कृत्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर युएपीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले. 

डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकी समाजनिर्मितीचे काम त्यांच्या हत्येनंतरही जोमाने सुरु आहे. 'अंनिस'चे कार्यकर्ते व इतर समविचारी नागरीक हे काम निष्ठेने पुढे नेत आहेत. जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचा लढा, जात पंचायतीच्या मनमानी विरोधातील आंदोलन, विवेकवाहिनी अशा अनेक अंगांनी हे काम विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान : 
डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (ता.20) दुपारी साडेचार वाजता ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते व स्वराज अभियानचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव हे 'कोरोनानंतर स्वराज्याचा अर्थ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 'सकाळ' व अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील. 'नरेंद्र दाभोलकरर्स थोट्स' या फेसबुकपेजवरून व्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण होईल. अभिवादन व निर्धाराच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन 'अंनिस'चे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हाअध्यक्ष डॉ.अरुण बुरांडे आणि जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केले आहे. याच दिवशी 'अंनिस'चे कार्यकर्ते व समविचारी संघटनातील साथी एकत्र येऊन देशभर ठिकठिकाणी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांचे काम जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्धार करणार आहेत. व्याख्यानाच्या लिंकसाठी 9422305929 व 8087876809 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT