Pune Metro
Pune Metro Sakal
पुणे

कात्रज-स्वारगेट मेट्रोला स्टेशन वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

धनकवडी - स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. परंतु, स्वारगेट ते कात्रज या मार्गात स्वारगेट, पद्मावती, कात्रज हे तीनच स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गावर पद्मावती ते कात्रजदरम्यान स्टेशन नसल्याने धनकवडी, बालाजीनगर आदी भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ती दूर करण्यासाठी या दोन्ही स्टेशनमध्ये बालाजीनगर किंवा भारती विद्यापीठ यापैकी एका ठिकाणी मेट्रो स्टेशन करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाचे स्टेशन पाहता, ते प्रवाशांच्या सोयीने अडचणीचे ठरणार असल्याने त्यास प्रतिसाद मिळणार नाही. सध्या मार्गावरील जे स्टेशन प्रस्तावित आहेत, त्यामध्ये पद्मावतीनंतर थेट कात्रज स्टेशन देण्यात आले आहे. या दोन्ही स्टेशनमधील अंतर साधारणपणे दोन किमीपेक्षा जास्त असल्याने नागरिकांची गैरसोय होईल.

मेट्रोसाठी प्रवाशांना एका स्टेशनवर उतरून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागेल. बालाजीनगर किंवा भारती विद्यापीठ येथे स्टेशन झाल्यास धनकवडी व बिबवेवाडीला जाणारा समांतर रस्ता जोडला जाईल. त्यामुळे बिबवेवाडीतील नागरिकांनाही थेट या स्टेशनवरून मेट्रोचा प्रवास करता येणे शक्य होईल. मेट्रोच्या आराखड्यात अजूनही बदल होणे शक्य आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर स्टेशनचा अंर्तभाव नवीन प्रस्तावित डीपीआर मध्ये करण्याची मागणी होत आहे.

धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार आदी भागांतील नागरिकांना होईल फायदा

अंदाजे एकूण ४ लाखांहून अधिक नागरिकांचे परिसरात वास्तव्य; तर लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा

परिसरात भारती विद्यापीठ, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज डेअरी आदी महत्वाची ठिकाणे

नागरिक, विद्यार्थी, कामगार, नोकरवर्ग, पर्यटक आदींची संख्या मोठी

मी धनकवडीत राहत असून कामानिमित्त रोज प्रवास करावे लागते. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गात जर भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर थांबा झाला तर मला मेट्रोने प्रवास करणे सोयीचे होईल.

- ज्योती निरगुडे, स्थानिक नागरिक

मला या मार्गावरून रोज प्रवास करावा लागतो. या मार्गाने मेट्रो धावणार हे प्रवाशांच्या सोयीने अडचणीचे ठरणार असल्याने त्यासाठी जवळचा थांबा पाहिजे. नाहीतर थांब्यापर्यंत जाण्यासाठी पुन्हा बसचा आधार घ्यावा लागेल.

- सुमित पटवर्धन, नोकरदार

भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर या मेट्रो स्टेशनचा अंर्तभाव महामेट्रोने स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या सुधारीत डिपीआर मध्ये करावा, याबाबतचे पत्र खा. सुप्रिया सुळे आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने स्टेशनचा अंतर्भाव होईल ही अपेक्षा आहे.

- विशाल तांबे, स्थानिक नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT