पुणे

पोस्टातील पासपोर्ट कार्यालये बंद असल्याने गैरसोय; सुरू करण्याची मागणी

मिलिंद संगई

बारामती : राज्याच्या विविध भागात सुरु केलेली पोस्टातील पासपोर्ट कार्यालय गेली सात महिने बंद असल्याने लोकांना पासपोर्ट काढणे व नूतनीकरणासाठी पुणे मुंबई नागपूर किंवा ठाणे येथे धाव घ्यावी लागत आहे. हजारो लोकांची ही कार्यालय बंद असल्याने गैरसोय होत असल्याने तातडीने ही कार्यालय पुन्हा सुरु करावीत, अशी लोकांची मागणी आहे.  

ग्रामीण भागातील लोकांना पासपोर्टचे अर्ज दाखल करण्यासाठी शहरात जावे लागू नये व शहरातील कार्यालयांवरील ताण कमी व्हावा या साठी देशभरातील अनेक पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले. बारामतीतही असे केंद्र सुरु झाले होते, त्या मुळे बारामतीकरांचा पुण्याचा हेलपाटा वाचत होता. 

कोविडचे संकट सुरु झाल्यानंतर लगेचच देशभरातील पोस्टातील पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला होता. त्या काळात या केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय झाला होता. आता मात्र अनलॉकच्या प्रक्रीयेत पोस्टासह सर्वच शासकीय कार्यालय सुरु झाली आहेत. त्या मुळे पोस्टातील पासपोर्ट कार्यालयही सुरु व्हावे, अशी लोकांची मागणी आहे. 

राज्यात 39 पोस्टातील पासपोर्ट कार्यालय...
महाराष्ट्रात मुंबई मध्ये 12, नागपूरअंतर्गत 10 व पुण्याअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात 17 अशा एकूण 39 पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु आहेत. लोकांना आपापल्या गावातच पासपोर्टचे काम करता यावे या उद्देशासह मुख्य कार्यालयांवरील ताण कमी व्हावा या साठी ही सुविधा सुरु केली आहे, मात्र सध्या सगळीच कार्यालय बंद असल्याने लोकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. 

 हा विषय परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील असल्याने या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करुन, यात काही मार्ग काढणे शक्य आहे का याची चाचपणी करु- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बारामती 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : महापालिकेत नगरसेविकांच्या पतींची अति लुडबूड; अधिकाऱ्यांना दमबाजी, मनमानी कारभार

'कूर्गी स्त्रिया सुंदर असतात आणि मी अशाच एकीशी लग्न केलंय': रश्मिकासाठी विजय देवरकोंडाचं गोड वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, Viral Video

चक्क 9000mAh बॅटरीवाला OnePlus Nord 6 लाँच! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Mumbai: मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांची शिकार, दात आणि इतर अवयव काढून...; ६ आरोपींना अटक

Mcoca Crime : सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’; पिंपरी चिंचवड पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई

SCROLL FOR NEXT