Ajit_Pawar 
पुणे

'पोपटासारखं बोलणाऱ्यांकडं दुर्लक्ष करा'; अजित पवारांनी काढला काँग्रेसला चिमटा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "काहीजण स्वत:हून उठतात आणि काहीही जाहीर करतात. पक्ष त्यांना तिकीट देईल की नाही, यांची माहिती नाही, पण पोपटासारखे बोलतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आगामी महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीने एकत्रित लढवियाच्या की नाही, हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरविणार आहेत,'' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची रविवारी (ता.२२) टिंगल केली. 

आगामी महापालिका निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढविण्याबाबतची चर्चा आहे. मात्र शहर कॉंग्रेसमधील काही नेते मंडळी त्याला विरोध करीत असून कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह धरीत आहे. पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पवार यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची टिंगल केली.

"पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पदवीधरची निवडणूक संपल्यानंतर लगेचच त्यांच्या तयारीला लागा,'' अशा सूचनाही पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या. यंदा अनुभवी चेहऱ्यांबरोबरच नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे सूचक वक्तव्यही यावेळी पवार यांनी केले. 

मागील दहा वर्ष महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा महापौर होता. मागील वेळेस लाट आली, असे सांगून पवार म्हणाले, "अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले. दबावाने आणि प्रलोभने दाखवून त्यांना घेण्यात आले. गेल्या चार वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार पुणेकरांनी पाहिला, स्मार्ट सिटीचे काय झाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन आमदार निवडून आले. यावरून पुणेकर आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचे मतदान झाले की आपल्याला बसावे लागेल.''

सत्तेचा गैरवापर करण्यास भाजप एक नंबर 
वॉर्ड रचनेबद्दल बोलताना पवार म्हणाले, "सत्तेचा गैरवापर करण्यात भाजप एक नंबरचा पक्ष आहे. मागील वेगळ्याच वार्डरचनेवरून हे समोर आले आहे. कशा पद्धतीने त्यांनी वॉर्ड रचना केली हे सगळ्याच माहिती आहे. यंदा असे होणार नाही. कारण मी आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sugarcane farmers : दहा साखर कारखान्यांकडे २८० कोटी थकीत; एफआरपीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

SCROLL FOR NEXT