पुणे : शहरात संचार मनाई आदेश लागू केल्यापासून आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी तब्बल 24 हजार रुग्णांना विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांसाठी पुणे पोलिसांकडून डिजीटल पास उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक गरोदर महिला कर्करोग्रस्त रुग्णांना पोलिसांनी सर्वाधिक मदत केली. त्यापाठोपाठ डायलिसीस, मधुमेही रुग्णांना पोलिसांकडून मदतीचा हात देण्यात आला.
आणखी वाचा - पुण्यात जनता वसाहतीत घुसला कोरोना वाचा सविस्तर बातमी
शहरामध्ये 22 मार्चपासून पोलिसांकडून नागरीकांना संचार करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त ठेवून नागरीकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु, याच कालावधीमध्ये विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण, गरोदर महिला, लहान मुलांचे आजार अशा वेगवेगळ्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात जाणे अत्यावश्यक होते. त्यादृष्टीने नागरीकांकडून पोलिसांकडे त्यांना कोणत्या प्रकारची मदतीची गरज आहे, या पद्धतीने पोलिसांच्या डिजीटल पाससाठीच्या संकेतस्थळावर अर्ज करत होते.
आणखी वाचा - कोरोनाच्या दहशतीत ही बातमी आहे आशेचा किरण
नागरीकांची तत्काळ वैद्यकीय गरज लक्षात घेऊन तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांच्या सेवा विभागाकडून त्यांना उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी केली जात होती. ही पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तत्काळ डिजीटल पास उपलब्ध करून दिला जात होता.
लॉकडाऊनच्या 50 दिवसांच्या कालावधीत पुणे पोलिसांकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे 23 हजार 970 अर्ज आले होते. ते सर्व अर्ज पोलिसांकडून मंजूर करण्यात आले होते. गरोदर महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी सर्वाधिक पाच हजार 604 इतके अर्ज आले होते, त्यापाठोपाठ कर्करोगग्रस्त रुग्णांच्या पाच हजार 101 अर्ज आले होते. त्यानंतर डायलिसीससाठी तीन हजार 769, शस्त्रक्रियेसाठी दोन हजार 789, आयसीयुमध्ये दाखल होण्यासाठी 2666, मधुमेही रुग्णांनी दोन हजार 507, लसीकरणासाठी 134 अर्ज प्राप्त झाले होते. ते सर्व अर्ज मंजूर करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांकडून दिलासा देण्यात आला.
- कामावर परत या; कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे आदेश!
"वैद्यकीय उपचारांसाठी नागरीकांनी 24 हजार अर्ज केले. आम्ही सर्वांचे अर्ज मंजुर करुन त्यांची सोय करुन दिली. आमच्याकडे अर्ज केलेल्या कोणत्याही नागरीकांना अडचण आली नाही. त्यांना वेळेत उपचार मिळू शकले.''
- बच्चन सिंग
"माझ्या वडीलांना डायलिसीससाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा रुग्णालयात जावे लागते. लॉकडाऊनमध्ये वडीलांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही पोलिसांच्या वेबसाईटवर अर्ज करीत होतो. एका दिवसात आमचा अर्ज मंजूर होऊन आम्हाला डिजीटल पास उपलब्ध करुन दिला जात होता.''
- स्नेहलता चव्हाण
पुणे पोलिसांकडून डिजीटल पास उपलब्ध करुन दिलेले रुग्ण
रुग्ण संख्या टक्के
गरोदर महिला 5604 23
कर्करोग 5101 21
डायलिसीस 3769 16
शस्त्रक्रिया 2789 12
आयसीयु दाखल होण्यासाठी 2666 11
मधुमेही 2507 11
लसीकरण, लहान मुलांचे आजार 1534 06
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.