valse patil.jpg 
पुणे

आंबेगावकरांसाठी दिलासादायक बातमी! १०० बेडचे कोविड हॉस्पिटल होणार सुरु

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) :” आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची वाढत चाललेली संख्या चिंताजनक आहे. अवसरी खुर्द येथे तंत्र निकेतन महाविद्यालयात सुरु केलेले एक हजार बेड क्षमतेचे कोविड उपचार केंद्रही अपुरे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंचर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सुविधेसह अतिदक्षता विभाग असलेले  १०० बेडचे कोविड हॉस्पिटल येत्या तीन ते चार दिवसात सुरु केले जाईल., ”असे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.


अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे सव्वा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवारी  (ता. २२) वळसे पाटील यांच्या हस्ते व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी वळसे पाटील म्हणाले “ पूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीला १८ महिन्यानंतर आटोक्यात आणण्यात यश आले. त्याप्रमाणेच कोरोना आजार अत्यंत धोकादायक आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभर थैमान घातले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य विभागासह प्रशासन चांगले काम करत आहे. पण ग्रामीण भागात प्रमाणित  मास्क वापरण्याकडे व वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपले गाव व कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आजार घरात आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बांधलेली ग्राम सचिवालय इमारत सर्व सुविधा युक्त सुसज्ज आहे. गावाच्या  वैभवात भर टाकणारी ही वास्तू आहे.”
 

पुणे जिल्हा परिषद , आंबेगाव तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून ग्रामसचिवालय इमारत उभी राहिली आहे. १४ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह  अत्याधुनिक रुग्णवाहिका लवकरच खरेदी करणार आहे. रुग्णवाहिकेचा फायदा अवसरी खुर्द सह अन्य गावांनाही होईल, असे ग्रामपंचायत सदस्य निलेश टेमकर व विकास भोर म्हणाले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश भोर, सभापती संजय  गवारी, उपसभापती संतोष भोर, डी. एम. शिंदे, सुष्मा शिंदे, आनंदराव शिंदे, संजय वायाळ, भरत भोर, शरद शिंदे उपस्थित होते. सरपंच संगीता शिंदे पाटील व उपसरपंच मल्हारी वायाळ यांनी  स्वागत केले. माजी सरपंच सुनिता प्रसाद कराळे व दिनेश खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. रसिका टेमकर यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT