Disagreements among officials over Municipal Corporation's decision to lease space 
पुणे

भाडे ठरेना अन् ‘घोडे’ पळेना!

सकाळवृत्तसेवा

पुणे : मोकळ्या जागा विकण्याऐवजी त्या भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला खरा; पण भाडे आकारायचे कसे, यावरुन या निर्णयाचे ‘घोडे’ अडले आहे. या जागा कशा आणि कोणाला द्यायच्या, या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महापालिकेतील गटनेत्यांनी नियमावलीत सुधारणा सुचविल्या असून, त्यानुसार बदल करून प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही महापालिका करीत आहे. दुसरीकडे मिळकत वाटप नियमावलीचा आधार घेऊनच जागा भाडेतत्त्वावर देण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

कोरोना, लॉकडाउनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली असून, वर्षभरात किमान साडेपाच-सहा हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असताना महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत साडेतीन हजार कोटीही जमले नाहीत. यापुढील काळातही उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याने महापालिकेच्या ताब्यातील सुविधा क्षेत्र (अॅमेनिटिज स्पेस) विकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याला विरोध होताच जागा विक्रीचा निर्णय मागे घेत त्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यावरून महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जागांचा प्रस्ताव रखडला आहे. शेवटी उपाय म्हणून गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन आधीच्या प्रस्तावात काही बदल सूचविण्यात आले असून, ते बदल नव्या प्रस्तावात घेण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला आहे.

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार 

शहराच्या विविध भागांतील २४६ जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्याचा भाव मिळकत वाटप नियमावलीनुसार आकारला जाणार आहे. ज्यामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, या नियमावलीतील दरानुसार जागा भाडेतत्त्वावर देण्यास महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचाच विरोध असल्याचे सांगण्यात आले.

राजकीय हस्तक्षेप होणार नाही
जागा भाडेतत्त्वावर देताना राजकीय क्षेत्रातील मंडळींना झुकते माप मिळण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या योजनेत सर्व घटकांतील नागरिकांना सहभागी होता येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ

''मिळकत वाटप नियमावलीनुसार या जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठीच्या हरकतींचा विचार करून अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल. नियमावलीत जागेचा भाव, करार आणि त्यांचा वापर या बाबींना प्राधान्य असेल. संबंधित जागा कुठे आहे, तिथे सोयीसुविधा काय आहेत, त्यानुसार भाडे आकारण्यात येईल.''
-राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT