tollplaza 
पुणे

खेड शिवापूर टोलनाक्याबाबत अशी सुरू आहे टोलवाटोलवी

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर (पुणे) : खेड शिवापूर टोलनाका पुढे हटविण्यात येणार नाही, असा निर्णय 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा'ने घेतला आहे, असे पुणे-सातारा टोल रोड व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तर, असा कोणताही निर्णय 'एनएचएआय'ने घेतलेला नसून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आयोजित बैठकीतच टोलनाका पुढे हटविण्याचा निर्णय होईल, असे 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले. अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन टोल प्रशासन सर्वांची दिशाभूल करत असल्याचा आरोप टोल नाका हटाव कृती समितीने केला आहे.  

पुणे- सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाका पुढे हलविण्यात यावा, या मागणीसाठी चार महिन्यांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, एनएचएआय आणि टोल प्रशासनाचे अधिकारी यांची चर्चा झाली. त्यात टोल हटाव समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होईल, त्या बैठकीत टोलनाका पुढे हलविण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगण्यात आले होते. 

या वेळी हवेली (पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हे, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोल फ्री सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. 

मात्र, टोलनाका हटाव समितीच्या आंदोलनाला चार महिने उलटून गेल्यावरही गडकरी यांच्यासोबत टोलनाका पुढे हटविण्यासंदर्भात बैठक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर टोल प्रशासनाशी संपर्क साधला असता खेड-शिवापूर टोलनाका पुढे हटविण्यात येणार नाही, असा निर्णय 'एनएचएआय'ने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत पुणे- सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले की, खेड शिवापूर टोलनाका पुढे हटविण्यात येणार नाही, असा निर्णय 'एनएचएआय'ने घेतला आहे. त्याबाबतचे पत्र लवकरच आम्हाला प्राप्त होईल. ते पत्र मिळताच पाच तालुक्याला दिलेली टोलमाफीही रद्द होईल.

मात्र, खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर म्हणाले की, टोलनाका हटविण्याच्या आमच्या मागणीवर अजून काहीही निर्णय झालेला नसून, तो निर्णय केंद्रीय पातळीवरच होईल. मात्र, अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन टोल प्रशासन नागरीकांची दिशाभूल करत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, खेड शिवापूर टोलनाका पुढे हटविण्यासंदर्भात एनएचएआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे आणि टोलनाका हटाव समितीचे सदस्य यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतच हा निर्णय होईल. एनएचएआयच्या अंतर्गत बैठका आणि निर्णयांशी टोल प्रशासनाचा काहीही संबंध नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

SCROLL FOR NEXT