Mask 
पुणे

प्लॅस्टिकचे विघटन अन् मास्कचा पुनर्वापर

अक्षता पवार

पुणे - महासागरांमधील वाढते प्लॅस्टिकचे प्रदूषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. सागरी जैवविविधतेबरोबरच पर्यावरणालाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. कोरोनाकाळात तर पीपीई किट, मास्क आदी वैद्यकीय प्लॅस्टिक कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून पुण्यातील शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिकच्या विघटनाबरोबरच मास्कचा पुनर्वापर करणारे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’ने (डीआयएटी) वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रक्रिया तयार केली आहे. या संशोधनाची माहिती नुकतीच ‘एनव्हायरंमेन्टल सायन्स अँड पोल्यूशन रिसर्च’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली आहे. त्यानुसार कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याबाबत अभ्यास केला आहे. यामध्ये पीपीई किट, मास्क, हातमोजे यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्लॅस्टिक कचरा पाण्यात पोचल्यावर त्याचे मायक्रो प्लॅस्टिकमध्ये रूपांतर होतो. तर वापरलेले मास्क, पीपीई किटची विल्हेवाट लावण्यासाठी या कचऱ्याला जाळण्यात येते. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडते. यात मोठ्या प्रमाणात मास्कचा कचरा तयार होत असल्याने यावर पर्याय म्हणून डीआयएटी मार्फत मास्कच्या पुर्नप्रक्रियेसाठी या नव्या तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. 

काय आहे नवीन प्रक्रिया ? 
वापरण्यात येणारे वैद्यकीय, कापडी किंवा यूज अँड थ्रो मास्कला वितळवूण त्यास पुन्हा वापरले जाऊ शकते. यासाठी सर्वप्रथम वापरण्यात आलेल्या मास्कला ‘स्टिम वॉशिंग’ आणि ‘सोडियम पोटॅशिअम वॉशिंग’च्या माध्यमातून स्वच्छ केले जाते. त्यानंतर या मास्कपासून पायपुसणी, टेबलवरील कापड किंवा तंतूमय पदार्थ (फायबर) तयार केले जातात. 

मास्कमध्ये प्लॅस्टिक
त्रिस्तरीय मास्कमध्ये ४.५ ते ११ ग्रॅम प्लॅस्टिक असते. एन- ९५ आणि वैद्यकीय मास्कमध्येही प्लॅस्टिकचे अंश असतात. विषाणूंच्या सानिध्यात आल्यामुळे अशा मास्कला जाळले जाते. बऱ्याचदा रस्त्यावर पडलेले, घरातील कचऱ्यात असलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. पर्यायाने त्यांच्यामुळे जलस्रोत प्रदूषित होण्याची शक्यता वाढते. 

प्लॅस्टिकचा प्रकार              आकार 
मायक्रो प्लॅस्टिक         ५ मिलिमीटरपेक्षा लहान कण 
नॅनो प्लॅस्टिक              १ मायक्रोमीटरपेक्षा लहान कण

जलस्रोतातून मायक्रो प्लॅस्टिकला काढणे किंवा त्याचे विघटीकरण यांसारख्या प्रक्रिया अद्याप मर्यादित आहेत. मात्र या संशोधनाच्या माध्यमातून भविष्यात बुरशी, जिवाणूसारख्या सूक्ष्मजीवांचा वापर करत अशा प्रकारच्या मायक्रो प्लॅस्टिकचे विघटन करणे शक्य होऊ शकेल. यासाठी मायक्रो प्लॅस्टिक ‘नॅनो प्लॅस्टिक’मध्ये रूपांतरित होण्यापूर्वी समुद्राच्या तळाशी साचलेले आणि पाण्यावर तरंगणारे या दोन्ही प्रकारच्या प्लॅस्टिकला विलगीकृत करून त्यांच्या घनतेच्या आधारावर ही प्रक्रिया केली जाऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाला कमी केले जाऊ शकते. 
- डॉ. बालासुब्रह्मण्यम, अधिष्ठाता- डीआयएटी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रिक्षावाल्या लेकाची माय! आईनं सांगितली पोराच्या प्रेमाची कहाणी; औषधाला पैसे नसतात तेव्हा...

'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर ऑईल व काॅईल सह साहित्याची चोरी

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

SCROLL FOR NEXT