Disputes between relatives due to removed from the WhatsApp group at Magarpatta Pune 
पुणे

व्हॉटसअप गृपमधून काढले म्हणून नातेवाईकांमध्ये शिवीगाळ, मारहाण 

सकाळवृत्तसेवा

पुणे : व्हॉटस्‌अप, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांद्वारे दूर गेलेल्या व्यक्ती, नातेवाई पुन्हा एकत्रित येत असल्याचे, त्यांच्यात चर्चा होण्याबरोबरच गाठीभेटीही होत असल्याची अनेक उदाहरणे आहे. मात्र, नातेवाईकांनी एकत्रित येण्यासाठी तयार केलेल्या व्हॉटस्‌अप गृपमधून महिलेला काढून टाकल्यामुळे नातेवाईकांमध्ये वाद झाले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर हे प्रकरण थेट शिवीगाळ व मारहाणीपर्यंत गेले. हा प्रकार हडपसरमधील मगरपट्टा येथे घडला. 

याप्रकरणी एका महिलेने तिच्या नातेवाईकांविरुद्ध मारहाण व विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील फिर्यादी महिला व पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती या एकमेकांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. ते सर्वजण हडपसर येथील मगरपट्टा परिसरात राहतात. सर्व नातेवाईक एकत्रीत यावेत, सुख-दुःखाच्या गोष्टींची देवाण घेवाण व्हावी, या उद्देशाने त्यांनी एक व्हॉटसअप गृप तयार केला होता.

पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्याचे वादग्रस्त पोस्टर उतरवले 

संबंधीत गृपमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. दरम्यान, एका नातेवाईकाने फिर्यादी महिलेस 29 फेब्रुवारीला त्यांच्या व्हॉटसअप ग्रुपमधून काढून टाकले. त्याचा राग आल्याने फिर्यादी महिला संबंधीत नातेवाईकाच्या घरी गेली. आपल्याला ग्रुपमधून का काढले, असा जाब तिने विचारला. त्यावेळी संबंधित नातेवाईकाने आरोपी महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीचे पती, सासू-सासरे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत जाऊन हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT