student1.jpg
student1.jpg 
पुणे

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब...

बंडू दातीर

पौड (पुणे) : कोरोनामुळे सर्वत्र शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे घरबसल्या शिक्षण चालू रहावे. यासाठी कळमशेतच्या (ता. मुळशी) प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅब मिळाले आहेत. राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक संजीव बागूल यांच्या धडपडीतून तालुक्यातील पहीली शाळा पाठ्यक्रमाच्या सॉफ्टवेअरसह शंभर टक्के टॅबयुक्त झाली. अठराविश्व दारिद्र्य असलेल्या उपेक्षित कातकरी समाजातील चिमुरड्यांच्या हातात टॅब आल्याने आता रेंज आणि वीजेविनाही विद्यार्थी  शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संकटातही संधी शोधून बागूल यांनी केलेल्या शिक्षणाच्या अनोख्या मुळशी पॅटर्नचे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनीही कौतुक केले. तालुक्यातील वनवासी कातकरी समाज हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. या समाजातील मुलांची पावले अलिकडे शाळेकडे वळू लागली आहेत. कळमशेत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बहुतांश मुले कातकरी समाजातील आहेत. वर्षभरापूर्वी बागूल यांची या शाळेत बदली झाली. यापूर्वी मांदेडे, संभवे या शाळेत नवोपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श शाळा करणारे बागूल यांनी आव्हान म्हणून कळमशेतची निवड केली. या शाळेतही त्यांनी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविले. त्यामुळे यापूर्वी ओढ्याकडे खेकडे, मासे पकडत फिरणारी मुले शाळेत बसू लागली. त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढली. अंगठेबहाद्दर पालकांचाही ओढा शाळेकडे वाढला.

कोरोनामुळे शाळांचे कामकाज बंद आहे. काही ठिकाणी ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र, रेंज आणि वीजेच्या खंडीतपणामुळे मुलांच्या शिकण्यात अडथळा येतो. अशावेळी माझ्याही विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकता यावे यासाठी बागूल यांनी इन्स्टिट्युट फॉर वुमन आंत्रप्रेनॉरियल या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना वनवासी कातकरी समाजातील मुलांची व्यथा समजावून सांगितली. त्यामुळे संस्थेने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले. त्यात पहीली ते चौथीच्या अॅनिमेटेड पाठ्यक्रमाचे सॉफ्टवेअर टाकले आहे.

शाळेच्या प्रांगणात टॅबचे पालकांना वितरण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, माजी सभापती रविंद्र कंधारे, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सरपंच अनंता कंधारे, उपसरपंच अशोक जोरी, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, सुदाम वाळूंज, लहू चव्हाण, दर्शना सोनवणे पाटील, सर्जेराव सोनवणे, प्रकाश सोनवणे, दिपक सोनवणे, राहुल सोनवणे, अविनाश कानगुडे, विद्या बागूल, मुख्याध्यापक बागूल, अनिल राठोड आदि उपस्थित होते. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनीही कार्यक्रमाच्यावेळी पालकांना ऑनलाइन शुभेच्छा देत बागूल यांच्या धडपडीचे कौतुक केले. केंद्रप्रमुख अविनाश टेमघरे यांनी सूत्रसंचालन केले.


इंग्रजी माध्यमाची पाच मुले कळमशेतच्या मराठी शाळेत
कळमशेतमधील काही मुले पौडला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकायला जात होती. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या मातांनी मराठी शाळेत रममाण होणारी मुले पाहीली. वर्षभरात या मुलांमधील गुणवत्ता त्यांनी हेरली. त्यामुळे यावर्षी त्यांनी आपल्या मुलांची इंग्रजी शाळांतील नावे काढून त्यांना बागूल सरांच्या मराठी शाळेत दाखल केले.

बागूल सरांच्या धडपड आणि त्यागी वृत्तीच्या ज्ञानसेवेमुळे कळमशेतमधील सर्वसामान्यांची मुले हुशार झाली. तालुक्यातील पहिली शाळा त्यांनी टॅबयुक्त करून कातकरी समाजातील मुलांना संगणक साक्षरतेचे धडे दिले आहेत. मुळशी तालुक्यातील आयटी कंपन्यांनी पुढाकार घेवून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना टॅब उपलब्ध करून दिल्यास घरबसल्या विद्यार्थी स्वतःहून शिकेन. या उपक्रमामुळे तालुक्यात शिक्षणाचा नवा मुळशी पॅटर्न बागूल यांनी तयार केला आहे.

- रविंद्र कंधारे, माजी सभापती 

माझ्या शाळेतील गोरगरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. घरबसल्या विनाइंटरनेट आणि विनारेंज त्यांना शिकता यावे यासाठी लोकसहभागातून टॅब मिळविले. त्यात पाठ्यक्रम टाकला. मुलांच्या घरी जावून त्यांना टॅबचे प्रशिक्षण देणार आहे. मुले टॅब व्यवस्थित हाताळतात की नाही हे पाहण्यासाठी गावातील स्वयंसेवकाची निवड केली असून आमच्या पगारातून त्याला मानधन देणार आहे. टॅबमुळे माझी मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याचा मला जास्त आनंद आहे.

 - संजीव बागूल, मुख्याध्यापक, कळमशेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT