fungus Sakal
पुणे

बुरशीच्या उपचारात प्रत्येकवेळी डोळ्याचा बळी नको : डॉ. रमेश मुर्ती

योग्य शस्त्रक्रिया आणि औषधांमुळे डोळा वाचतो; नेत्ररोग तज्ज्ञांचे आवाहन.

सम्राट कदम

पुणे ः म्युकरमायकोसिसमध्ये चोहऱ्यावरील बुरशी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढावी लागते. अशा वेळी डोळा, जबडा, दात असे अवयवही काढण्याची वेळ येवू शकते. काही वेळा तर रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी घाईगडबडीत किंवा निष्णात डॉक्टरांच्या अभावी कारण नसताना डोळा काढला जातो. पण, योग्य शस्त्रक्रिया केल्यास हा डोळा वाचवता येतो. प्रत्येकवेळी डोळ्याचा बळी नको, असे मत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रमेश मुर्ती यांनी व्यक्त केले.

देशभरात आता म्युकरमायकोसिसचे रूग्ण वाढत असून, उशिरा निदान झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते. मुळात अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ असलेल्या या आजाराबद्दल डॉक्टरांसह प्रशासनालाही कमी माहिती होती. या बद्दल जनजागृती झाली असून, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. मुर्ती हे पुण्यातील रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या डोळ्यासंबंधीच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहे. त्यांना आजवर आलेल्या अनुभवाच्या आधारे आणि डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतून त्यांनी काही तथ्ये समोर मांडली आहेत.

- डोळ्यासंबंधीचे समज गैरसमज ः

गैरसमज ः तथ्य

१) म्युकरमायकोसिसच्या प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात ः बहुतेक रुग्णांमध्ये डोळे काढण्याची गरज नाही. तसेच प्रत्येक वेळी डोळे काढून फायदा होईलच असेही नाही.

२) बुरशी डोळ्यापर्यंत पोचल्यावर दृष्टी जाते ः बहुतेक वेळा डोळ्यापर्यंत जाणाऱ्या नसा बंद झाल्यामुळे दृष्टी जाते. याचा अर्थ डोळ्यात बुरशी पोचली असा होत नाही. खर तर बहुतेकांमध्ये बुरशी डोळ्यात पोहचत नाही.

३) डोळ्यापर्यंत बुरशी पोहचल्यास शस्त्रक्रिया आवश्यकच ः शस्त्रक्रियेव्यतिरीक्त आपल्याकडे असे इंजेक्शन उपलब्ध आहे. ज्याद्वारे बुरशीची वाढ रोखता येते आणि डोळा वाचविता येतो.

४) डोळ्याला सूज आली म्हणजे रोग हाताबाहेर गेला ः बहुतेक वेळा डोळ्या शेजारच्या भागात बुरशी वाढलेली असते. याचा अर्थ ती डोळ्यात पोचली असा नसतो.

५) डोळ्याशी निगडित समस्या औषधोपचाराने सुटत नाही ः डोळ्याजवळ आलेली सूज औषधांनी आणि इंजेक्शनने कमी होऊ शकते. ॲन्टीफंगल औषधांच्या वापराने बुरशीची वाढ थांबवता येते.

६) ‘सायनस’ची समस्या सोडवली तरीही डोळ्याची समस्या सुटत नाही ः सायनसमधील बुरशी व्यवस्थित काढल्यास चेहऱ्यावरील बुहरशीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्याचा थेट फायदा डोळ्यांना होतो.

डॉक्टरांनी पुढे येणे आवश्यक ः बुरशीच्या आजारासंबंधी रोज नवे तथ्ये समोर येत आहे. अशा वेळी डॉक्टरांच्या समुदायाने स्वतःला लवकर अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन संशोधन आणि तथ्यांना समोर मांडणे गरजेचे आहे. यातून उपचार पद्धती अधिक शास्त्रीय बनेल. त्याचबरोबर अनेकांचे प्राण वाचतील, असे मत तज्ज्ञांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT