पुणे

नाटकाचा ‘कणा’ मोडू नका!; निर्मात्या भाग्यश्री देसाई यांची भावना

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना आणि लॉकडाउनचा तडाखा सोसत नाटक पुन्हा उभे राहू लागले आहे. कलाकारांनी मानधन कमी केले, वृत्तपत्रांनी जाहिरातीमध्ये सवलत दिली. नाटकाचा खरा कणा असलेल्या पडद्यामागील कलाकारही या काळात भक्कमपणे पुन्हा उभा राहिला पाहिजे. त्याचे मानधन कुणी कमी करू नये. निर्माता म्हणून आम्ही स्वत: ही भूमिका घेतली आहे, अशी भावना अभिनेत्री-निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी व्यक्त केली.

तब्बल नऊ महिन्यांनंतर देसाई यांचे एक नाटक रंगमंचावर येत आहे. बहुतांश नाटकांचे निर्माते मुंबईतील असतात; पण हे नाटक पुण्यातील निर्मात्यांचे आणि पुण्यातीलच कलाकारांचे आहे. देसाई म्हणाल्या, ‘‘पुणे हे नाट्यरसिकांचे शहर आहे. नाटक पुन्हा सुरू होत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद आणखी वाढला पाहिजे, तरच नाट्यक्षेत्र पुन्हा सक्षमपणे उभे राहू शकणार आहे. ही कला लोकाश्रयावर चालणारी आहे. रसिकांनी त्याला पाठबळ दिले पाहिजे.’’

‘‘मार्चपासून नाट्यगृह आणि सिनेमागृह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली; पण त्यावेळी पुन्हा सर्व सुरू होण्यासाठी नऊ महिने वाट पाहावी लागेल असे वाटले नाही. या काळात बरेच काही बदल घडले. पुढील काळात त्याचे प्रतिबिंब नाटकात उमटेलच. विषयातले नावीन्य आणि मांडणीच्या शैली कदाचित बदलतील; पण नाटक हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, तो मात्र पुढेही कायम राहील,’’ असे  देसाई म्हणाल्या.

नाट्यगृहे बंद झाल्यानंतर पडद्यामागील कलाकारांना सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागले; परंतु नाट्यकर्मींनी त्यांना शक्‍य ती सर्व मदत केली. त्यात नाटकाच्या बस ड्रायव्हरपासून मॅनेजरपर्यंत सर्वांचा समावेश होता. आता नव्या उभारीने नाटक पुन्हा सुरू होत आहे. वृत्तपत्रांनी सहकार्य दाखवत आपल्या जाहिरातीचे दर कमी केले, अनेक नाट्यगृहांनी भाडे कमी केले आहे. आम्ही पडद्यामागील आणि पडद्यावरील कोणत्याही कलाकाराच्या मानधनामध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटाचा दर मात्र कमी केला आहे, असे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ब्लाइंड गेम’चा उद्या प्रयोग
भाग्यश्री देसाई यांचे ‘ब्लाइंड गेम’ या दोन अंकी थरार नाट्याचा प्रयोग येत्या शुक्रवारी (ता. २५) बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेत या प्रयोग केला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT