Ganeshotsav_Ajit_Pawar 
पुणे

सार्वजनिक गणेश मंडळाच्या दर्शनाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पोलिसांना दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Festival 2020 : पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मानाचे गणपती आणि इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. तसेच, मेट्रो, पुरंदर विमानतळ यासह रखडलेली विकासकामे लवकर मार्गी लावावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विधानभवन सभागृहात शुक्रवारी जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन आणि नियोजना'बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी कोणीही गर्दी करु नये.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवा :
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्यातील साथीच्या आजाराच्या रुग्णांवरही वेळेत वैद्यकीय उपचार करण्याबाबत आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलिस आणि महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन करणे, फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था आणि गणेश मूर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील आत्तापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची माहिती दिली. ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट वाढविण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधीग्रस्तांच्या तपासणीवर भर देवून रुग्णदर,  मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले.

'आयसर'चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर यांनी कोरोनाविषयी सादरीकरण केले. जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी उपाययोजनांची माहिती दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narmada Water: २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळाला, चार राज्यांमध्ये एकमत; फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयाची घोषणा

Koyna Dam Water Level : कोयना धरणात दहा दिवसातच वाढला 27.77 टीएमसी पाणीसाठा; महाबळेश्वरला 24 तासांत 266 मिमी पाऊस, पाहा धरण आणि तालुकानिहाय आकडेवारी

Latest Marathi News Live Update : नागपुरात सर्वच भागात पावसाला सुरुवात

Pregnancy Test Kit : प्रेग्नन्सी टेस्ट किट नेमकं कसं काम करते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

Talegaon Chakan Highway Traffic : तळेगाव-चाकण महामार्गावर वाहतूक कोंडीचा बुधवार; २२ किलोमीटरच्या टप्प्यात तब्बल ७ तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT