E-bus service on Sinhagad suspended for fortnight E-bus service on Sinhagad suspended for fortnight
पुणे

सिंहगडावरील ई-बस वाहतुकीला पंधरा दिवसांत स्थगिती

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

निलेश बोरुडे

किरकटवाडी : पुण्यातील सिंहगडावर 2 मे पासून ये-जा करण्यासाठी वन विभाग व पीएमपी प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केलेली ई-बस सेवा तात्काळ स्थगित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या निवेदनानंतर पवार यांनी तातडीने कार्यवाही करत सदर निर्णय घेतला आहे. (E-bus service on Sinhagad suspended for fortnight)

2 मे पासून सिंहगडावर ई-बस (E-bus) सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत घाट रस्त्यावर अपघाताच्या तीन घटना घडल्या. यातील एका घटनेत चाळीस ते पन्नास नागरिक थोडक्यात बचावले होते. रस्ता अरुंद असल्याने व बसचा आकार जास्त असल्याने दोन बस समोरासमोर आल्यानंतरही चालकांना कसरत करावी लागत होती. तसेच ई-बस चार्जिंग करण्यासाठीही केवळ दोन चार्जिंग पॉईंट तयार करण्यात आले होते.

रविवारी हजारो पर्यटक ई-बसने (E-bus) गडावर पोहचले होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून नागरिक गडावरुन खाली येण्यासाठी गाडीतळावर रांगेत उभे होते, मात्र चार्जिंग अभावी एक तासाने एक बस खाली येत होती. परिणामी लहान मुले, वृद्ध,महिला यांची मोठी गैरसोय झाली. शेकडो नागरिक रात्रीच्या अंधारात चालत घाट रस्त्याने खाली आले. गैरसोय झाल्याने नागरिक प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते.

स्थानिकांचा तीव्र विरोध

विश्वासात न घेता ई-बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने व यामुळे रोजगारावर परिणाम झाल्याने स्थानिकांचा ई-बस उपक्रमाला तीव्र विरोध होता. याबाबत रविवारी राजेआ शिवराय प्रतिष्ठान व स्थानिक नागरिकांनी सिंहगड पायथ्याशी वन विभाग व पीएमपी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले होते.

पंधरा दिवसांत तीन वेळा अपघात झाले होते. रस्ता अरुंद असल्याने व बसचा आकार जास्त असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. तसेच स्थानिक नागरिकांच्या रोजगाराची समस्या गंभीर झाली होती. सर्व बाबी पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर, त्यांनी याबाबत उपाययोजना होईपर्यंत ई-बसला स्थगिती देण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.

- नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT