Election-Commission
Election-Commission 
पुणे

Vidhan Sabha 2019 : कुठपर्यंत झालीय तयारी? निवडणूक आयोगाने घेतला आढावा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज (ता.11) पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी अन् कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि  सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी.

मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल, याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT