Farm 
पुणे

इंदापूरातील शेतकऱ्यांवर अस्मानीसोबत सुलतानी संकट; बागायती शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर वनविभागाकडून तालुक्यातील गोखळी, राजवडी, भरणेवाडी या गावांमधील वन खात्याच्या जमिनीवर असलेली अतिक्रमणे काढण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा, पत्र्यांची बांधकामे, बागायती शेती याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना महामारी सुरू असताना तसेच या खात्याचे मंत्री तथा लोकप्रतिनिधी तालुक्यात असताना देखील ही कारवाई झाल्याने अनेक शेतकरी बेघर झाले आहेत.

त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारी समजून घेऊन न वागल्यास भविष्यात आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वनखात्याच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ''लॉकडाऊनच्या काळामध्ये शासकीय वनअधिकार्‍यांनी गोर गरीब, मागासवर्गीय, भूमिहीन शेतकऱ्यांची घरे आणि शेती जेसीबी लावून उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे लोकांचा संसार उघड्यावर आला असून हे लोक बेघर झाले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर या लोकांनी राहायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जेसीबी, पोकलेन आणि दोनशे एसआरपीचे जवान या ठिकाणी येऊन दडपशाही करतात हे चुकीचे आहे.

चार ते पाच दशकांपूर्वी महसूल व वन खाते एकत्र असताना शासनाने या जमिनी दिल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा देखील दिल्या असताना ही कारवाई झाली. त्यामुळे संबंधितांना ताबडतोब शासनाने निवारा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांना माणुसकीच्या भावनेतून पर्याय काढून द्यावा लागणार आहे. तसेच यासंदर्भात शासनाने सहा महिने कोणतीही कारवाई करू नये, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

Latest Marathi News Live Update : ७५ विद्यार्थी परदेशात अडचणीत, फंडस् नॉट रिसिव्हीड अधिकाऱ्यांची लाजिरवाणी कबुली!

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

भुयारी मार्गाने जोडले जाणार ठाणे-बोरीवली! देशातील सर्वात लांब शहरी बोगदा होणार; ११ किलोमीटरचा मार्ग कसा असेल?

SCROLL FOR NEXT