Explosive detecting technology should be developed says G Satish Reddy 
पुणे

'स्फोटके शोधणारे तंत्रज्ञान विकसित व्हावे' - जी. सतीश रेड्डी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "भारतामध्ये सध्या "भूसुरुंग शोधणे' (एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍शन) या तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगभरात यावर संशोधन होत आहे. याबरोबर जैविक (बायोलॉजिकल) स्फोटके शोधण्यासाठीदेखील संशोधन होणे महत्त्वाचे आहे,'' असे मत भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.

डीआरडीओच्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) हीरक जयंती महोत्सवानिमित्त "स्फोटक शोधके' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे (एनडब्ल्यूईडी) आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. "एसीई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पी. के मेहता, "एचईएमआरएल'चे अध्यक्ष के. पी. एस. मूर्ती, भोपाळ येथील आयसरचे अध्यक्ष डॉ. उमापती व राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे उपस्थित होते.

बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

डॉ. रेड्डी म्हणाले, "वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे स्फोटकांचा शोध घेणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील विविध सुरक्षा संस्थांना नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीत खोलवर लपविण्यात आलेले भूसुरुंग शोधणे, या संस्थांसाठी आव्हानात्मक आहे. असामाजिक घटकांच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी स्फोटक शोधक यंत्रणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.''

CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही

या वेळी त्यांनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि एचईएमआरएलच्या पाठपुराव्यामुळे सहज हाताळण्यात येणाऱ्या "रायडर-एक्‍स' या उपकरणाच्या निर्मितीबाबत आनंद व्यक्त केला. नाईकनवरे यांनी माओवाद्यांच्या भागात स्फोटक तपासणी दरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली.

देशात गेल्या दशकभरामध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे स्फोटक शोधण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सक्षम यंत्रणा आपल्याकडे नसल्याने सुरक्षा रक्षकांना जिवाचा धोका वाढतो. यामुळे शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेची गरज लक्षात घेऊन याबाबत संशोधन केले पाहिजे.
-डॉ. जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT