avsari phata 
पुणे

आंबेगावात कोरोनाला रोखण्यासाठी या सुविधा देणार  

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घ्या. ऑगस्टमध्ये चारशेपर्यंत बाधितांची संख्या जाण्याची भीती आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सुविधा वाढविण्याचे नियोजन करावे. घोडेगाव येथे कोविड सेंटर सुरु करावे. ऑक्सिजन सुविधेच्या पाच रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत कराव्यात. कोविड वाॅर कक्ष व आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सक्षम करावा, असे आदेश कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. ३१) झालेल्या कोविड आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, मंचर व घोडेगाव शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. तेथे अधिक लक्ष द्यावे. जनजागृतीबरोबरच सर्वेक्षणाचे काम प्रभावीपणे झाले पाहिजे. भीमाशंकर या खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे मिळाली पाहिजे. कोरोनाबाधित उपचार घेऊन बरे झाल्यानंतर तेही फिरणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांचे दोन स्वतंत्र कक्ष अवसरी खुर्द तंत्र निकेतन महाविद्यालयात सुरु करावेत. मास्क व पीपीई कीटचा साठा उपलब्ध करून ठेवा. दानशूर व्यक्तींच्या मदतीतून ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन व वाफ घेण्यासाठी नेबुलायझर कीट उपलब्ध झाले पाहिजे, असा प्रत्येक गावातून प्रयत्न करावा.

कोविड कामात अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाला मदत करत आहेत. पण, अधिकारी वर्गाकडून त्यांना उलटी उत्तरे दिली जात आहेत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ही गंभीर बाब आहे. या पुढे असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने जनतेशी सौजन्याने वागावे, अशा सूचना वळसे पाटील यांनी दिल्या. 

जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यामुळे अनेक दानशुरांनी वैद्यकीय साहित्यासाठी मदत केली आहे. ३९ गावांत कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी मंचर, घोडेगाव शहरातील बाधित रुग्णाची संख्या अधिक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी रुग्ण वाढू नये म्हणून योग्य नियोजन करावे. बाधित रुग्ण ज्या भागात आहेत. तोच भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करावे. गरज असेल तेथे शासनाच्या निकषानुसार खासगी डॉक्टर नेमावेत. खासगी रुग्णालयांना वेळेत दर पंधरा दिवसांनी पेमेंट देण्याची व्यवस्था केली आहे. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना दर्जेदार सेवा द्यावी.

शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती संजय गवारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, प्रांत अधिकारी रमा जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. अंबादास देवमाने, डॉ. श्रीरंग फडतरे, डॉ. राहुल फडके, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उद्योजक अजय घुले, गणपतराव कोकणे आदींनी चर्चेत भाग घेतला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT