A family in Murum is attacked with a sword by a group of 12 to 15 people
A family in Murum is attacked with a sword by a group of 12 to 15 people 
पुणे

मुरूम येथील एका कुटुंबावर बारा ते पंधरा जणांच्या टोळक्याने शस्त्रांच्या सहाय्याने केला प्राणघातक हल्ला

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे)  : गाईच्या किरकोळ व्यवहारावरून मुरूम (ता. बारामती) येथील इनामदार कुटुंबावर साखरवाडी (ता. फलटण) येथील बारा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तलवारी, गज या शस्त्रांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

साखरवाडी येथील एकाशी मुरूमचे वाहिद इनामदार यांनी गाईचा व्यवहार केला होता. इनामदार यांच्याकडे आज सकाळी साखरवाडीचे दोघेजण गाईचे पैसे मागायला आले होते. यावेळी बाचाबाची झाल्याचे समजते. यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान वाजता साखरवाडी येथील १२ ते १५ जणांनी दुचाकीवर येऊन इनामदार कुटुंबावर तलवार, गज, दगड या सहाय्याने हल्ला चढविला.

जवळपास तासभर आरोपींचा गोंधळ सुरू होता. मध्ये पडणारासमोर तलवार फिरवत होते. या हल्ल्यामध्ये अब्दुलकरीम इनामदार, वाहिद इनामदार, फिरोज इनामदार, फारुख इनामदार, मोईन इनामदार, जहांगीर इनामदार हे सहाजण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जहांगीर यांची तब्बेत चिंताजनक आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. यावेळी महिला व मुलांनाही मारहाण व अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे, नुसरत इनामदार, सलमा इनामदार यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही साखरवाडी येथे जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. संभाजी महादेव खोमणे (वय 23 रा. मुरुम ता. फलटण) ज्ञानेश्वर वसंत बोडरे (वय 24) व संजय किसन गरडकर (वय 44) (दोघेही रा. साखरवाडी ता. फलटण) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT