Few People in pune are misusing PMC Kit And Services In pune.jpg 
पुणे

धक्कादायक! लॉकडाऊनमध्येही पुण्यात घडताहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन मध्ये माणुसकीची काही उदाहरणे पुढे आली, तशी माणुसकीला काळिमा फासणारे काही प्रकार देखील या निमित्ताने समोर आले आहे. पती पोलिस, तर मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरी देखील किटसाठी महापालिकेकडे आग्रह धरणारी महिला, महापालिकेकडून मदत घेऊन नेत्यांच्या नावाने त्यांचे वाटप करणारे, मिळालेले किटची परस्पर विक्री करणारे, आम्हाला नाही तर कोणालाच नाही, असे अनेक धक्कादायक अनुभव महापालिका प्रशासनाला आले. 

लॉकडाऊनच्या काळात फेक फेसबुक अकांऊटवरुन महिलेला मेसेज आला अन....

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 23 मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेबरोबरच शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. शेल्टर होम मधील नागरिकांना जेवण देणे, गरजू आणि गरिबांना धान्याचे किट वाटणे, चहा, बिस्किटे, मास्क, सॅनिटयझरपासून साबण अशा अनेक गोष्टींचे वाटप काही संस्था स्वत:च्या स्तरावर तर काही संस्था महापालिकेच्या मदतीने करीत आहेत. या मदत वाटपाच्या निमित्ताने अनेक चांगले वाईट अनुभव महापालिका प्रशासनाला आले असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न घेता सकाळाला सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्व भागातील एका महिलेचे पती पोलिस खात्यामध्ये आहे. तर मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. परंतु महापालिकेकडे किटसाठी ती महिला गेल्या अनेक दिवस पाठपुरावा करीत आहे. औंध आणि परिसरात महापालिकेच्या मदतीने वाटपासाठी गेल्या एका स्वयंसेवी संस्थेचा टेम्पोच नागरिकांना अडवून धरला. "ठराविक लोकांनाच मदत का, आम्हाला पाहिजे. आम्हाला नाही, तर कोणालाही नाही,'' असा दम भरत तेथील नागरिकांनी त्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना परत पाठवून दिले. तर एका ठिकाणी महापालिकेच्या मदतीने किट वाटपासाठी गेल्यानंतर त्या परिसरातील माननीयांनी ते किट स्वत:च्या नावाच्या पिशवीत भरून लोकांना त्याचे वाटप केले. अशा या चित्रविचित्र अनुभवामुळे मदतीसाठी पुढे आलेल्या अनेक संस्थांनी महापालिकेकडे आपली नाराजी तीव्र शब्दात बोलून दाखविली. 

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?
एकीकडे हा अनुभव असताना दुसरीकडे मात्र परिस्थिती बेताची असताना अनेकांनी जमेल तेवढी मदतीचे वाटप केल्याचा गोड अनुभव अधिकाऱ्यांना आला. एका विद्यार्थ्यांने स्वत:च्या खर्चातून एका कुटुंबाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तर कात्रज येथील एका मजुराच्या कुटुंबाने पाच जणांना स्वखर्चातून धान्याचे किट वाटप करण्याची इच्छा महापालिकेकडे व्यक्त केली आणि त्यांचे वाटपही केले. यावरून एकीकडे माणुसकी दाखविणारे तर दुसरीकडे स्वार्थासाठी वाटेल त्या स्तराला जाणारे असे दोन्ही प्रकाराची नागरिक या लॉकडाऊ नच्या निमित्ताने पाहावयास मिळाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या बोलीवर सकाळला सांगितले. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT