PMC
PMC  sakal
पुणे

Pune : वर्षभरात २४ लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने २०२२-२३ या अर्थिक वर्षात २४ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ०१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, किओक्स, जहिरात फलक आदींवर कारवाई करत ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक अमोल गावंडे आणि प्र. परवाना निरिक्षक अंकुश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये अनाधिकृत बोर्ड, बॅनरपोटी केलेल्या कारवाईतून २ लाख ४९ हजार ५०० रुपये, अनाधिकृत जहिरात फलकांवर केलेल्या कारवाईतून ४ लाख रुपये आणि अनाधिकृत जहिरात फलक निष्काषित करुन जागामालकांच्या मिळकतीवर १८ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. तर या काळात बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, किओक्स, जहिरात फलक या कारवाईच्या माध्यमांतून २३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्ता

कालावधी-हटविण्यात आलेले बॅनर, किओस्क, जहिरात फलक संख्या-होर्डिंग संख्या

  • एप्रिल २०२२-२९६०-०२

  • मे २०२२-२०१३-००

  • जून २०२२-२०८८-०६

  • जुलै २०२२-१९४५-१०

  • ऑगस्ट २०२२-८७५-१५

  • सप्टेंबर २०२२-७१४-३

  • ऑक्टोबर २०२२-७३१-४

  • नोव्हेंबर २०२२-६०३-११

  • डिसेंबर २०२२-६९०-३५

  • जानेवारी २०२३-५१८-२७

  • फेब्रुवारी २०२३४८८-२३

  • मार्च २०२३-३१३-९

प्रतिक्रिया

परवाना आणि आकाशचिन्ह विभागांकडून कारवाई केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रभागाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणांवर फ्लेक्स आणि बॅनरबाजी झालेली असते. ही बॅनरबाजी सर्सास अनाधिकृत असते. याकडे आकाशचिन्ह कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. कारवाई करतानाही सर्सास न करता हितसंबंध संभाळूनच केली जात असल्याचे केलेल्या प्रत्यक्षदर्शी कारवाईवरून दिसून येते.

त्याचबरोबर, प्रत्यक्षात हटविण्यात आलेल्या अनाधिकृत बोर्ड, बॅनर, किओस्क, फ्लेक्स, जहिरात फलकांच्या संख्येत आणि दंडात्मक कारवाई केलेल्या संख्येत प्रचंड तफावत आहे. - महादेव हांगे, स्थानिक नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT