Fire Department truck driver controlled fire at the age of 58 in Pimple gurav in pune 
पुणे

वयाच्या ५८ व्या वर्षी अग्निशमन दलाच्या वाहन चालकाची आगीवर मात; पाहा काय घडले?

सकाळवृत्तसेवा

पुणे : अग्निशमन दलाकडे असणारे वाहन चालक हे विविध अग्निशमन वाहने चालविण्यात तरबेज असतातच व एखादी आगीची घटना घडली किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास वेळेत कसें पोहचावे हे कौशल्य त्यांच्या अंगी असतेच. पण हे असताना एक जवान म्हणून आगीशी सामना करण्यासाठी ही ते सज्ज असतात अशीच एक घटना काल घडली. 

डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात वाहन चालक म्हणून काम करणारे बंडेराव गणपती पाटील(वय ५८) हे काल सकाळी ड्युटी करून ते पिंपळे गुरव येथे घरी असताना सायंकाळी त्यांच्या शेजारी असणारया घरामध्ये आग लागून गृहपयोगी काही साहित्य व फ्रिज जळाले. ही घटना घडत असताना नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर पाटील यांनी त्या घराकडे तातडीने धाव घेतली व एक स्थानिक युवक योगेश पाटील यांच्या मदतीने तेथील पाण्याचा वापर करत आग शमविली, यामध्ये घराचे नुकसान झाले तरी पाटील यांच्या तत्परतेने पुढील अनर्थ टळला. नंतर रहाटणी अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले होते. पाटील यांनी केलेल्या कामाचे स्थानिकांनी कौतुक केले. 

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

अग्निशमन वाहन चालक बंडेराव पाटील हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त असून अग्निशमन दलात कर्तव्य बजावत आहेत. आयुष्यभर देशाची सेवा करुन ते वयोपरत्वे वयाच्या ५८ व्या वर्षी येत्या मे महिन्यात अग्निशमन दलातून ही निवृत्त होत आहेत.
पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

Marathwada News: मराठवाड्यात कृषी पर्यटनाला चालना ; १५० शेतकऱ्यांची नोंदणी, ११६ कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी

SCROLL FOR NEXT